Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जगभरात टॅरिफवरुन गोंधळ घातला आहे. त्यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादला असताना, रशियन तेल खरेदीवर दंड म्हणून पुन्हा 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ देखील लादला आहे. याशिवाय युक्रेन युद्धावरून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच चीनवरही मोठा टॅरिफ जाहीर करण्यात आला आहे, मात्र, अद्याप हा टॅरिफ लागू झालेला नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आज मोठी घोषणा करणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

Continues below advertisement


जगाच्या नजरा ट्रम्पच्या घोषणेवर 


पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी एससीओ शिखर परिषदेदरम्यान चर्चा केली आहे. भारताने अद्याप अमेरिकेसोबत कोणताही व्यापार करार केलेला नसला तरी, आता रशिया, चीन आणि भारत एकाच व्यासपीठावर आल्याने संपूर्ण जगाच्या नजरा येथे खिळल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रात्री 11 वाजून 30 मिनीटांनी एक मोठी घोषणा करणार आहेत.


टॅरिफसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता


ट्रम्प व्यापाराशी संबंधित धोरण किंवा टॅरिफवर काही मोठी घोषणा करू शकतात असाही अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेच्या एका न्यायालयाने नुकतेच ट्रम्प यांचे शुल्क बेकायदेशीर घोषित केले आहे. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे बोलले. ट्रम्प प्रशासनाला आधीच माहिती होती की शुल्कांवरील न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात येऊ शकतो. यामुळे, ट्रम्प प्रशासनाने आधीच प्लॅन बी तयार करण्यास सुरुवात केली होती.


राजीनाम्याबद्दल अफवा 


गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. ते ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत सक्रिय राहिले. त्याच वेळी, 79 वर्षीय ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दलही अफवा पसरत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरल्या आणि #WhereIsTrump सारखे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते. 


अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार आणि ऊर्जेवरून तणाव


अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार आणि ऊर्जेवरून तणाव वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लादल्यानंतर आणि रशियन तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल एक कडक संदेश दिला आहे. बेसंट म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यात एक मजबूत पाया आहे आणि दोन्ही देशांमधील कोणतेही मतभेद सोडवता येणं शक्य आहे.


महत्वाच्या बातम्या:


उपोषणामुळं मनोज जरांगे पाटलांची स्थिती नाजूक, तब्बेतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती