एक्स्प्लोर

LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?

LPG price Hike Gas Cylinder Rate: सर्वसामान्यांचं किचन बजेट कोलमडणार, घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात मोठी वाढ

LPG price Hike Gas Cylinder Rate: गेल्या काही दिवसांपासून देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना रविवारी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका दिला आहे. रविवारी सकाळपासून घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder Price)  दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एलपीजी (LPG) सिलेंडरचा भाव 29 रुपयांनी वाढला आहे. यामुळे 'कॉमन मॅन'च्या घरातील किचन बजेट कोलमडणार आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यांत एलपीजीच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, आता दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील इतर भागांतही 29 रुपयांचीच वाढ झाली आहे. (LPG Gas Rate)

घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरुन 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता 29 रुपयांची दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सामान्य माणूस अगोदरच मेटाकुटीला आला असताना एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे. एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलेंडरमागे 703 रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या (Commercial LPG rate) दरात वाढ केली होती. 1 जून रोजी कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर  42 रुपयांनी वाढला होता.  गेल्या पाच महिन्यात 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत. 1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1580 रुपये होता. 1 जूनला तोच दर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 19 किलोच्या एलपीजीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात जानेवारी महिन्यात 111 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये 28 रुपये, 7 मार्चला 114.50 रुपये, एप्रिल महिन्यात 195.50 रुपये, मे महिन्यात 993 रुपये आणि जून महिन्यात 42 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे दर वाढले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चिंता वाढत आहेत. पेट्रोल-़डिझेल, गॅस व अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

तेल कंपन्यांना मोठा फटका, दररोज 600 कोटी रुपयांचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Embed widget