Britannia : एका भारतीय कंपनीने एक विशेष ऑफर (Exclusive offer) दिली आहे. एका दिवसाच्या इंटर्नशिपसाठी (internship) कंपनी 3 लाख रुपये देणार आहे. ही स्वप्नवत वाटणारी ऑफर आघाडीची भारतीय खाद्य उत्पादन कंपनी ब्रिटानियाने ( Britannia Treat Croissant) दिली आहे. यामध्ये निवड झालेल्या व्यक्तीला ऑफिसमध्ये एक दिवस घालवण्यासाठी 3 लाख रुपये दिले जातील. ही नेमकी प्रक्रिया काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फूड प्रोडक्ट कंपनीने क्रॉस प्रोनन्सिएशन एक्सपर्टच्या नावाने ही इंटर्नशिपची संधी आणली आहे. यामध्ये विजेत्याला ब्रिटानियाच्या कार्यालयात एक दिवस राहून कर्मचाऱ्यांना या प्रसिद्ध फ्रेंच पेस्ट्री क्रोइसंटचे नाव अचूकपणे उच्चारायला शिकवावे लागते. तुम्हालाही सहज पैसे कमवायचे असतील तर ही संधी फक्त तुमच्यासाठी आहे. भारतात क्रॉस खूप आवडतात. पण, लोकांना त्याचे नाव बरोबर घेणे अवघड जाते.


या संधीसाठी कसा कराल अर्ज?


तुम्हीही वयाची 18 वर्षे पूर्ण केली असल्यास आणि भाषा बोलण्याची पद्धत याबद्दल उत्साही असाल, तर ही अनोखी इंटर्नशिप संधी तुमच्यासाठीच आहे. ब्रिटानियाची ही संधी संपूर्ण भारतासाठी आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या व्हॉट्सॲप चॅनलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्याची नोंदणी लिंक Britannia Crossan च्या Instagram बायोमध्ये आढळेल. यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, त्यानंतर तुम्हाला कंपनीचे इन्स्टाग्राम पेज फॉलो करावे लागेल आणि त्यावर 2 टास्क पूर्ण करावे लागतील. तुमची निवड झाली तर तुम्हाला एका दिवसाचे 3 लाख रुपये मिळतील. 


निवड झालेल्यांना नेमकं काय करावं लागणार?


कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवसाची इंटर्नशिप करणारी व्यक्ती आमच्या लोकांना क्रॉसचा उच्चार योग्यरित्या करायला शिकवेल. त्याला ब्रिटानिया क्रॉसचा आवाज बनण्याची संधी दिली जाईल. जर तुम्हाला त्याचा भाग व्हायचे असेल तर तुम्ही 10 मार्चपर्यंत नोंदणी करू शकता. त्यासाठीचे अर्ज 4 मार्चपासून सुरु करण्यात आले आहेत. Croissant अजूनही लक्झरी स्नॅक मानले जाते. आम्हाला ती सर्वसामान्यांची आवडती वस्तू बनवायची असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या:


Google Internship 2024 : गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी, 80 हजार पगार; अर्ज कसा आणि कुठे कराल? जाणून घ्या...