Meri Saheli Yojana : महिलांच्या सुरक्षेसाठी (safety for women) मोदी सरकारनं (Modi Govt) देशभरात एका योजना सुरु केली आहे. मेरी सहेली योजना(Meri Saheli Yojna) असं या योजनेचं नाव आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना महिलांना कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास त्या या योजनेअंतर्गत तक्रार करू शकतात. या योजनेचा लाभ नेमका कसा घेता येईल? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

  


महिलांच्या सुरक्षेचा विचार करून सरकार अनेक कठोर पावले उचलत आहे, ज्यामध्ये 'मेरी सहेली योजना' ही एक योजना आहे. जी महिलांना प्रवास करताना अनेक सुविधा देणार आहे. या योजनेचा लाभ ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आली तर तुम्ही या योजनेअंतर्गत अनेक प्रकारे मदत घेऊ शकता. 


कोणत्या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ? 


ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला या योजनेचा फायदा होईल. विशेषत: ट्रेनमध्ये एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना. अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा महिला ट्रेनमध्ये एकट्या प्रवास करतात तेव्हा लोक एकतर त्यांची चेष्टा करतात किंवा त्यांचा विनयभंग करतात. या कारणास्तव ही योजना आणली आहे. ज्यामध्ये ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला विशेष सुरक्षा मिळेल. मेरी सहेली योजनेच्या टीममध्ये फक्त महिलांचा समावेश असेल. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची काळजी फक्त महिलाच घेतील. ही टीम एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेला ती कुठे जात आहे किंवा कोणी तिचा छळ करत आहे का हे विचारू शकते. तुम्हाला ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत आहे का? याबाबतची माहिती विचारण्याक येणार आहे. 


प्रत्येक रेल्वे स्थानकावर कर्मचारी असणार


महिला प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर वेगवेगळी टीम मिळेल. या योजनेनुसार, कोणत्याही कारवाईसाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएसएफ एस्कॉर्ट कर्मचारी आणि आरपीएफ उपस्थित राहतील.


टोल फ्री क्रमांकावर तक्रार करु शकता? 


महिला प्रवाशांना ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्या टोल फ्री क्रमांक 182 वर तक्रार करू शकतात. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किंवा गैरसोय झाल्यास ती या क्रमांकावर संपर्क करू शकते. सप्टेंबर 2020 मध्ये, हा उपक्रम दक्षिण पूर्वेकडून सुरू करण्यात आला. ज्यामध्ये महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती.


महत्वाच्या बातम्या:


काय आहे पंतप्रधान सूर्योदय योजना? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर