Income Tax Return Filing: आर्थिक वर्ष 2020-21 करीता आयकर विवरणपत्र दाखल (Income Tax Return filing)करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. तर, दुसरीकडे आयकर खात्याच्या वेबपोर्टलविरोधात असंतोष वाढत आहे. ITR दाखल करण्यासाठी शेवटची मुदत 31 डिसेंबर आहे. ही मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंडही करण्यात आला.
केंद्र सरकारने याआधी Income Tax Return दाखल करण्याची मुदत ही 31 जुलैहून 30 सप्टेंबर आणि त्यानंतर आता 31 डिसेंबर केली होती. Income Tax Return दाखल करताना वेबसाइटवर येणाऱ्या अडचणींमुळे काही दिवस साइट बंद होती. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा करदात्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. आताही ITR दाखल करताना वेबसाइटमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
सीए, वैयक्तिरीत्या ITR दाखल करणाऱ्यांनी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंड केला. अनेकांनी उपरोधिकपणे सरकारवर टीकाही केली आहे. एका ट्विटर युजरने म्हटले की, 31 डिसेंबर ही शेवटची मुदत ITR चे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांसाठी आहे. करदात्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने ही मुदत करदात्यांसाठी नाही, असेही त्यांनी म्हटले. अनेकांनी मीम्सही तयार केले आहेत.
दरम्यान, आयकर विभागाने सांगितले की, 27 डिसेंबरपर्यंत एकूण 4,67,45,249 ITR दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून आयकर विभागाने विवरणपत्र दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा न करण्याचे आवाहन केले होते. शक्य होईल तेवढ्या लवकर विवरणपत्र दाखल करावे असे आवाहन आयकर विभागाने केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Reliance : रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे लवकरच नव्या पिढीकडे; मुकेश अंबानी यांचे संकेत
- Welcome to India! Intel भारतात करणार सेमीकंडक्टर निर्मिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha