एक्स्प्लोर

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 2 टक्के वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?

DA Hike: केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या घोषणेनंतर वित्त मंत्रालयानं त्याला मंजुरी दिली आहे. यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

DA Hike News नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आलं आहे. वित्त मंत्रालायनं आता महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं महागाई भत्ता 58 टक्क्यांवरुन 60 टक्क्यावंर पोहोचला आहे. 60 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून जारी करण्यात नोटिफिकेशननुसार या प्रस्तावाला राष्ट्रपतींकडून अगोदरच मंजुरी मिळाली होती.  

18 एप्रिलला महागाई भत्ता वाढीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करण्याचा निर्णय 18 एप्रिल  2026 ला घेतला होता.  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्याचा (DA) आणि महागाई दिलाशाचा (DR) अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीतील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी एकूण 6791.24 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याचा फायदा सुमारे 50.46 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 68.27 लाख पेन्शनधारकांना होईल.ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे.

पगार किती वाढणार?

केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतनं 50000 हजार रुपये असेल तर पगारात 1000 रुपयांची वाढ होईल. मूळ वेतन 50000 आणि 60 टक्क्यांप्रमाणं महागाई भत्ता 30000 रुपये मिळेलं. महागाई भत्ता वाढल्यानं सरकारी  कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल.  

तीन महिन्यांचा फरक मिळणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचा फरक एकाच वेळी मिळेल. एखाद्या कर्मचाऱ्याला 2 टक्के वाढीमुळं एका महिन्याच्या पगारात 1000 रुपयांची वाढ मिळणार असेल तर त्याला तीन महिन्यांचा फरक म्हणून 3000 रुपये मिळतील.

दरम्यान, केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगानुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये  महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेते. या घोषणेस उशीर झाल्यास कर्मचाऱ्याचं  नुकसान होतं. तर, काही वेळा महागाई भत्ता फरक एकाच वेळी मिळाल्यानं कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळते. 

180000 रुपये मूळ वेतन असल्यास पगार 360 रुपयांनी वाढेल. तर, 25 हजार पगार असणाऱ्यांच्या पगारात 500 रुपयांची तर, 36500 मूळ वेतन असणाऱ्यांच्या पगारात 730 रुपये वाढतील. ज्यांचं मूळ वेतन 1 लाख रुपये आहे त्यांचा महागाई भत्ता  2000 रुपयांनी वाढेल. तर, ज्यांना  1 लाख 50 हजार रुपये मूळ वेतनं मिळतं त्यांच्या महागाई भत्ता 3000 रुपयांनी वाढेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Agreements Between India And UAE मोठी बातमी: एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार
एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर: तुमच्या मासिक बजेटवर ताण न आणता स्मार्ट कर्ज कसे घ्याल?
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर: तुमच्या मासिक बजेटवर ताण न आणता स्मार्ट कर्ज कसे घ्याल?
Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Petrol Diesel Price Hike: ...तर पेट्रोल-डिझेलचे दर तिप्पट वाढले असते? इंधन दरवाढीमागचे 'हे' आहे खरं कारण!
...तर पेट्रोल-डिझेलचे दर तिप्पट वाढले असते? इंधन दरवाढीमागचे 'हे' आहे खरं कारण!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
Embed widget