Free Electricity : दिल्ली सरकारच्या (Delhi government) मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राजधानीतील जनतेला 200 युनिट मोफत विजेची (free electricity) सुविधा पुढेही मिळणार आहे. वीज ग्राहकांना पुढील वर्षापर्यंत मोफत वीज मिळत राहील, असे सरकारने म्हटले आहे. याशिवाय 400 युनिटपर्यंत निम्मे बिल भरावे लागणार आहे. याशिवाय वकिलांना आणि 1984 दंगलग्रस्तांना मोफत वीज 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.


दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (DERC) ने काही दिवसांपूर्वी देशाच्या राजधानीत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबाबत एक आदेश जारी केला होता. या अंतर्गत दर वाढवण्याची परवानगी देण्यात आली होती. या अंतर्गत, BSES यमुना पॉवर लिमिटेड (BYPL) च्या दरांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली होती. जी 9.42 टक्के होती. त्यानंतर BSES राजधानी पॉवर लिमिटेड (BRPL) च्या दरांमध्ये 6.39 टक्क्यांची वाढ झाली होती. नवी दिल्ली नगरपरिषद (NDMC) चे दर सर्वात कमी वाढले होते, जे 2 टक्के होते. टाटा पॉवर डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (TPDDL) ने कोणतीही वाढ केली नाही.


दिल्लीत 58 लाख वीज ग्राहक, त्यापैकी 47 लाख जणांना सबसिडी मिळते


अलीकडच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्ली सरकार दरमहा 200 युनिट मोफत वीज देत आहे. तर 201 ते 400 युनिटपर्यंतच्या वीज बिलावर अर्धा दर भरावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत सुमारे 58 लाख वीज ग्राहक आहेत, त्यापैकी 47 लाख जणांना सबसिडी मिळते. त्यापैकी 30 लाख असे आहेत ज्यांचे मासिक बिल शून्य आहे.


दरम्यान, उद्योग चालवणाऱ्या लोकांनाही या अंतर्गत फायदा होईल, असे मत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सौर धोरण 2024 बद्दल माहिती देताना व्यक्त केलं होतं. आपल्या व्यावसायिक युनिट्सवर सौर पॅनल बसवल्यास लोकांचे वीज बिल निम्म्याने कमी होऊ शकते. तसेच, जे आपल्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावतात, त्यांना वीज कितीही युनिट वापरली तरी शून्य बिल भरावे लागेल, असेही ते म्हणाले. दिल्ली सौर धोरणांतर्गत, केजरीवाल सरकारने पुढील तीन वर्षांत 500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या सर्व सरकारी इमारतींमध्ये सौर पॅनेल बसवणे अनिवार्य करण्याची योजना आखली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


आनंदवार्ता! शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी निविदा अंतिम; 25,000 रोजगार निर्मिती होणार