CreditScore नवी दिल्ली: जर तुम्ही क्रेडिट कार्डरचा वापर करत असाल किंवा कर्जाचे ईएमआय भरत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लवकरच एक नियम लागू करणार आहे. त्यानुसार एप्रिल 2026 पासून लोकांना क्रेडिट स्कोअरसाठी फार वाट पाहावी लागणार नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी अपडेट केला जाणार आहे.

CreditScoreUpdate : क्रेडिट स्कोअर दर आठवड्याला अपडेट होणार

नव्या नियमानुसार आता क्रेडिट स्कोअर एका महिन्यात दोन वेळा अपडेट करण्याऐवजी दर सात दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे. हा बदल आरबीआयच्या ड्राफ्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग (प्रथम दुरुस्ती ) निर्देश 2025नुसार लागू केला जाणार आहे. या प्रस्तावानुसार सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना एका महिन्यात पाचवेळा कर्जदाराची माहिती अपडेट करावी लागेल. यासाठीच्या तारखा दर महि्याच्या7, 14, 21, 28 आणि महिन्याचा शेवटचा दिवस अशा असतील.

आरबीआयच्या या पावलाचा उद्देश क्रेडिट डेटारिपोर्टिंग आणि अपडेट करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करणं आहे. यामुळं ज्या लोकांचं कर्ज लेटेस्ट क्रेडिट स्कोअरमुळंप्रलंबित आहे त्यांना फायदा होणार आहे.

काय बदल होणार?

बँक किंवा वित्तीय संस्थांना महिन्यात एकदा किंवा दोनवेळासिबिल, इक्विफॅक्स, एक्सपीरियन किंवा क्रिफहाई मार्क या सारख्या क्रेडिट ब्यूरोलाडेटा पाठवायला लागत असे. आता बँक किंवा एनबीएफसी महिन्यात एकदा क्रेडिट रेकॉर्डची माहिती पाठवतील. मात्र, त्यांना दरम्यानच्या बदलांची माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये नव्यानं कर्ज दिलं गेलं असेल, बंद केलेली खाती, कर्ज परतफेड, कर्जदाराची माहिती यातील काही बदल, कर्जाचं वर्गीकरण यातील बदल याची माहिती, म्हणजेच एखाद्यानं क्रेडिट कार्ड बंद केलं, कर्जाची पूर्ण परतफेड केली किंवा रिपेमेंटट्रॅकरेकॉर्डमध्ये सुधारणा केली तर हे बदल काही दिवसात त्याच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसतील.

कर्जदारांना काय फायदा होणार?

ईएमआय किंवा कर्ज परतफेडीनंतर क्रेडिट स्कोअऱमध्ये सुधारणांसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही. क्रेडिट स्कोअरमध्ये ज्या वेगानं सुधारणा होईल त्याच वेगानं कर्ज मंजूर होईल. वेळोवेळी डेटाअपडेट झाल्याचा फायदा क्रेडिट हेल्थवर दिसून येईल. त्यामुळं चांगल्या व्याज दरावर कर्ज मिळण्यास मदत होईल. बँकेजवळ तुमचा लेटेस्टअपडेटेडडेटा असल्यास नवं कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करता त्यावेळी कोणतीही अडचण येणार नाही.