नागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा पहिल्यांदाच तीन पातळ्यांवर असणार आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर जाहीरनामा तयार केला जाईलच सोबतच प्रत्येक उमेदवाराला त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी वेगळा जाहीरनामा तयार करण्याची मुभा दिली जाणार आहे. तशी माहिती काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. 


अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी


एवढच नाही तर मुस्लिमांसाठीही या जाहीरनाम्यात विशेष लक्ष पुरवले जाणार आहे. मुस्लीमही या देशाचे नागरिक असून ते इथे जन्मले आहेत. म्हणून दुसऱ्यांचा जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार मुस्लिमांचाही आहे, असे नितीन राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या न्यायपत्रात (जाहीरनाम्यात) अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी हल्लाबोल केला होता. यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर, पंतप्रधानांनी आमच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर टीका केली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही भारताचा नागरिक म्हणून मुस्लिमांची काळजी घेणार नाही. मुस्लीम बांधव या देशाचे नागरिक असून ते इथेच जन्मलेले आहेत. त्यांचाही या देशात अधिकार आहे. म्हणून आमच्या जाहीरनाम्यात त्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे नितीन राऊत म्हणाले.


मतदारांना दिल्या जातील गॅरंटी


दरम्यान कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांना जशा पद्धतीने मतदारांसाठी गॅरंटी जाहीर केल्या होत्याअगदी तशाच गॅरंटी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही मतदारांना दिल्या जातील, असेही नितीन राऊत म्हणाले. दरम्यान त्या गॅरंटी कोणत्या असतील हे तूर्तास नितीन राऊत यांनी उघड केलेले नाही.


काय खास असेल काँग्रेसच्या जाहीरनाम्यात?


>>>> काँग्रेसचा जाहीरनामा तीन पातळ्यांवर असेल 


>>>> राज्यासाठी तर जाहीरनामा राहीलच. सोबतच स्थानिक विषयांना महत्त्व देण्यासाठी जिल्हा पातळीवर वेगळा जाहीरनामा राहील.


>>>> प्रत्येक उमेदवाराला विधानसभांसाठी  स्वतंत्र जाहीरनामा जाहीर करण्याची मुभा असेल.


>>>> कर्नाटक, तेलंगणाच्या धर्तीवर काँग्रेस मतदारांना अनेक बाबतीत गॅरंटी जाहीर करेल. 


>>>> मुस्लीमही या देशाची नागरिक असून त्यांचा या देशावर तेवढाच अधिकार हे मान्य करत त्यांच्यासाठी विशेष तरतूद जाहीरनाम्यात असेल.


>>>> काँग्रेसचा जाहीरनामा न्याय पत्र या नावाने असेल.


>>>> संविधान रक्षणावर विशेष भर जाहीरनाम्यात दिला जाईल.


हेही वाचा :


मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?


सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर चूकच, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले