PM Kisan Samman Nidhi Yojana News : शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं (Govt) विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ( PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो. आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, तुम्हाला जर पुढचा 18 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आत्ताच काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल.
महत्वाची कामे पूर्ण करा
देशातील करोडो शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. शेतकरी 18 वा हप्ता कधी जमा होऊल याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मिळालेल्य़आ माहितीनुसार पुढील हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. हे काम न केल्यास तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो. याशिवाय, तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर आजच करा. ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला जीएम किसान सन्मान निधीचा पुढचा म्हणजे 18 वा हप्ता मिळेल, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहाल.
नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक बरोबर आहे का तपासा
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेला तपशील तपासणे आवश्यक आहे. अर्जामध्ये नाव, लिंग, आधार क्रमांक, खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा. तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने भरल्यास, तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेसंदर्भातील माहिती कुठे मिळेल?
योजनेशी संबंधित अपडेटसाठी किसन भाई अधिकृत साइट pmkisan.gov.in ची मदत घेऊ शकतात. शेतकरी बांधवही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी करू शकतात. शेतकरी बांधवांना काही अडचण येत असेल तर ते हेल्पलाइन क्रमांक 155261 ची मदत घेऊ शकतात. योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव 1800115526 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
महत्वाच्या बातम्या: