मुंबई: शेअर बाजारातील (Closing Bell Share Market Updates Sensex) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काहीशी अस्थिरता दिसून आली. आज सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 87 अंकांची घसरण झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 36 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,663 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.20 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,307 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही 20 अंकांची घसरण होऊन तो 42,437 अंकांवर पोहोचला. 


आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1424 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1966 शेअर्समध्ये घट झाली. आज एकूम 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज बाजार बंद होताना HCL Technologies, HUL, Asian Paints, SBI आणि Kotak Mahindra Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर M&M, Bajaj Auto, Cipla, IndusInd Bank आणि Maruti Suzuki कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. 


आज रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या इंडेक्समधे घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात काहीशी सकारात्मक झाली होती. पण बाजार बंद होण्यापूर्वी अर्ध्या तासांत विक्री होत असल्याचं दिसून आलं आणि परिणामी सेन्सेक्स काही अंकांनी घसरला.


रुपयामध्ये चार पैशांची घसरण 


डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये चार पैशांची घसरण झाली आहे. गुरुवारी रुपयाची किंमत ही 81.64 इतकी होती. तर आज रुपयाची किंमत ही 81.68 इतकी आहे. 


या शेअर्समध्ये वाढ झाली



  • HCL Tech- 0.97 टक्के

  • HUL- 0.96 टक्के

  • Asian Paints- 0.78 टक्के

  • SBI- 0.61 टक्के

  • Kotak Mahindra- 0.46 टक्के


या शेअर्समध्ये घसरण झाली



  • M&M- 2.56 टक्के

  • Bajaj Auto- 1.66 टक्के

  • IndusInd Bank- 1.56 टक्के

  • Maruti Suzuki- 1.54 टक्के

  • Cipla- 1.53 टक्के


ही बातमी वाचा :