मुंबई: शेअर बाजारातील आजचा दिवस (Closing Bell Share Market Updates) मोठ्या अस्थिरतेचा असल्याचं दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 33 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 4 आज अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.05 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,834 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये आज 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,701 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकमध्ये आज 229 अंकांची वाढ होऊन तो 43,332 अंकावर स्थिरावला.
आज शेअर बाजार बंद होताना एकूण 2080 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1401 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 191 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना Apollo Hospitals, Tata Motors, Reliance Industries, Tech Mahindra आणि SBI Life Insurance यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर Hindalco Industries, Tata Steel, UPL, ONGC आणि Coal India यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.
ऑटो, फार्मा आणि आयटी क्षेत्रामध्ये आज विक्री झाल्याचं दिसून आलं तर सार्वजनिक बँका, रिअॅलिटी आणि मेटलच्या इंडेक्समध्ये खरेदी झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये आज काहीशी घसरण झाली.
रुपयामध्ये 48 पैशांची घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयामध्ये 48 पैशांची घसरण होऊन तो 81.79 वर पोहोचला. शुक्रवारी रुपयाची किंमत ही 81.31 टक्के इतकी होती.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- Hindalco- 4.34 टक्के
- Tata Steel- 3.44 टक्के
- UPL- 2.44 टक्के
- Coal India- 2.05 टक्के
- ONGC- 2.02 टक्के
या शेअर्समध्ये घट झाली
- Apollo Hospital- 1.91 टक्के
- Tata Motors- 1.53 टक्के
- Reliance- 1.46 टक्के
- Tech Mahindra- 1.35 टक्के
- SBI Life Insurance- 0.82 टक्के
शेअर बाजाराची सुरुवात
शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली. आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 62,865.28 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 18,719.55 अंकावर खुला झाला. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 326.11 अंकांच्या घसरणीसह 62,542.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 97.55 अंकांच्या घसरणीसह 18,598.55 अंकांवर व्यवहार करत होता.