मुंबई: शेअर बाजारात (Closing Bell Share Market Updates) आज गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 518 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 147 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज  0.84 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,144 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्ये आज 0.81 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,159 अंकावर बंद झाला. निफ्टी बँकमध्येही आज 90 अंकांची घसरण होऊन तो 42,346 वर बंद झाला. 


शेअर बाजारात आज 1462 शेअर्समध्ये वाढ झाली, 2014 शेअर्समध्ये घसरण झाली, तसेच आज 170 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज बाजार बंद होताना ONGC, Adani Ports, Reliance Industries, Hindalco Industries आणि HDFC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर  BPCL, Bharti Airtel, Axis Bank, HUL आणि IndusInd Bank कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


आज सार्वजनिक बँक इंडेक्समध्ये 1.4 टक्क्यांनी वधारला, तर ऑईल अॅन्ड गॅस, आयटी, उर्जा आणि रिअॅलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्यांपर्यंत घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही आज काहीशी घसरण झाली. 


शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने 


आज बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 207.15 अंकांच्या घसरणीसह 61,456.33 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 61.25  अंकांच्या घसरणीसह 18,246.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 460 अंकांच्या घसरणीसह 61,202.94 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 134.20 अंकांच्या घसरणीसह 18,173.45 अंकांवर व्यवहार करत होता. 


रुपयाची 16 पैशांनी घसरण 


डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची 16 पैशांनी घसरण झाली आहे. शुक्रवारी रुपयाची किंमत ही 81.68 इतकी होती, आज ती 81.84 इतकी झाली आहे. 


या शेअर्समध्ये वाढ झाली



  • BPC- 2.04 टक्के

  • Bharti Airtel- 1.66 टक्के

  • Axis Bank- 1.26 टक्के

  • IndusInd Bank- 0.92 टक्के

  • HUL- 0.71 टक्के


या शेअर्समध्ये घसरण झाली



  • ONGC- 4.44 टक्के

  • Adani Ports- 1.95 टक्के

  • Hindalco- 1.84 टक्के

  • HDFC- 1.81 टक्के

  • Reliance- 1.80 टक्के

     




ही बातमी वाचा: