मुंबई: सलग सहा सत्राच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात (Stock Market Updates) आज घसरण झाल्याचं दिसून आलं. सोमवारी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारात चांगलीच तेजी होती, पण ती कायम न राहता त्यामध्ये आज घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 287 अंकांची घसरण झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 74 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.48 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,543 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.42 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,656 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही आज 182 अंकांची घसरण होऊन तो 41,122 अंकांवर पोहोचला. 


आज बाजार बंद होताना सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली तर कॅपिटल गुड्स आणि ऑटो क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली. एफएमसीजी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली.


आज एकूण 1378 समभागामध्ये वाढ झाली, तर 1951 समभागामध्ये घसरण झाली. आज 106 समभागामध्ये कोणताही बदल झाला नाही. आज बाजार बंद होताना Nestle India, HUL, Kotak Mahindra Bank, Bajaj Finserv आणि Britannia Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर Tech Mahindra, Maruti Suzuki, JSW Steel, Larsen & Toubro आणि Eicher Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.4 टक्क्यांची तर मिडकॅपमध्ये 0.3 टक्क्यांची घसरण झाली. 


सोमवारी मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी शेअर बाजाराच चांगलीच तेजी असल्याचं दिसून आलं. सेन्सेक्समध्ये 524 अंकांची वाढ झाली. तर निफ्टीमध्ये 162 अंकांची वाढ झाली. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक तासासाठी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचा कार्यक्रम पार पडला जातो. सोमवारी हा मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत पार पडला. 


शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक


शेअर बाजार सुरु झाला त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 20 अंकांनी वधारत 59,852.13 अंकांवर व्यवहार करत होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12.80 अंकांच्या तेजीसह 17,743.55 अंकावर व्यवहार करत होता. 


या कंपन्यांचे शेअर्स वाढले 



  • Tech Mahindra- 3.28 टक्के

  • Maruti Suzuki- 2.73 टक्के

  • JSW Steel- 2.34 टक्के

  • Larsen- 2.06 टक्के

  • Eicher Motors- 1.91 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले 



  • Nestle- 2.84 टक्के

  • HUL- 2.63 टक्के

  • Kotak Mahindra- 2.60 टक्के

  • Bajaj Finserv- 2.54 टक्के

  • Britannia- 2.33 टक्के