मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव आल्याचं दिसून आल्याने शेअर बाजारात (Stock Market Updates) आज मोठी घसरण झाली. शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये  (Sensex) 953 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 311 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,145 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.79  टक्क्यांची घसरण होऊन तो 17,016 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 930 अंकांची घसरण होऊन तो 38,616 अंकावर पोहोचला. 


आज शेअर बाजार बंद होताना 630 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2860 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच 120 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आज Tata Motors, Adani Ports, Hindalco Industries, Maruti Suzuki आणि Eicher Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. तर  HCL Technologies, Infosys, Asian Paints, Divis Labs आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


आज आयटी क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये दोन ते तीन टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं. 


रुपयाची विक्रमी घसरण 


डॉलरच्या तुलनेत रुपयाची निचांकी घसरण झाली आहे. आज रुपयाच्या किमतीत 63 पैशांची घसरण झाली. आज रुपयाची किंमत ही 81.62 इतकी झाली आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने 


शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 573.89 अंकांच्या घसरणीसह 57,525 अंकांवर खुला झाला. तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी 171.05  अंकांच्या घसरणीसह 17,156 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 440 अंकांच्या घसरणीसह 57,658.76 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 164  अंकांच्या घसरणीसह 17,162.95 अंकांवर व्यवहार करत होता. 


या कंपन्यांचे शेअर्स वधारले 



  • Asian Paints- 1.26 टक्के

  • HCL Tech- 1.21 टक्के

  • Infosys- 1.08 टक्के

  • Divis Labs- 0.75 टक्के

  • UltraTechCement- 0.61 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले 



  • Tata Motors- 6.05 टक्के

  • Hindalco- 5.79 टक्के

  • Adani Ports- 5.52 टक्के

  • Maruti Suzuki- 5.44 टक्के

  • Eicher Motors- 4.69 टक्के