मुंबई: शेअर बाजारातील आजचा दिवस तुलनेने काहीसा अस्थिर असल्याचं दिसून आलं. तरीही बाजार बंद होताना (Share Market Closing Bell) तो काहीसा वधारला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 114 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 64 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.19 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,950 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.36 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,117 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये मात्र आज 39 अंकांची घसरण होऊन तो 41,258 अंकांवर बंद झाला.
आज बाजार बंद होताना एकूण 1997 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1356 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना Adani Enterprises, Hindalco Industries, Bajaj Finserv, Adani Ports आणि JSW Steel यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Hero MotoCorp, Dr Reddy’s Laboratories, BPCL, Cipla आणि HDFC Life निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज बाजार बंद होताना मेटलच्या इंडेक्समध्ये चार टक्क्यांची तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली आहे. तसेच फार्मा इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये काहीशी घसरण झाली, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.4 टक्क्यांची वाढ झाली.
आज या शेअर्समध्ये वाढ झाली
- Adani Enterpris- 6.76 टक्के
- Hindalco- 4.92 टक्के
- Bajaj Finserv- 4.48 टक्के
- Adani Ports- 3.48 टक्के
- JSW Steel- 3.17 टक्के
आज या शेअर्समध्ये घसरण झाली
- Hero Motocorp- 2.17 टक्के
- Cipla- 1.46 टक्के
- Dr Reddys Labs- 1.41 टक्के
- BPCL- 1.23 टक्के
- HDFC Life- 1.12 टक्के
शेअर बाजाराची सुरुवात
संमिश्र जागतिक संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 102 अंकांच्या वाढीसह 60,936 वर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37 अंकांच्या वाढीसह 18,090 अंकांवर उघडला.
रुपया वधारला
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत काहीशी वाढली आहे. शुक्रवारी रुपयाची किंमत ही 82.88 इतकी होती. त्यामध्ये आज सुधारणा होऊन ती 82.43 वर पोहोचली आहे.