मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा दिवस सकारात्मक असल्याचं दिसून आलं. शेअर बाजार बंद होताना आज सेन्सेक्स मध्ये 436 अंकांची वाढ झाली तर निफ्टीही 105 अंकांनी वधारला. आज सेन्सेक्समध्ये 0.79 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,818 वर पोहोचला तर निफ्टीमध्ये 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,628 वर पोहोचला.
आज बाजार बंद होताना रिलायन्सच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली. गेल्या महिन्याभरातील कंपनीची ही सर्वात चांगली कामगिरी आहे. तसचे फायनान्शिअर मार्केटमधील HDFC, HDFC Bank आणि ICICI Bank यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना 1919 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1301 कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. 134 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ऑईल अॅन्ड गॅस क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आहे तर ऑटो आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. मिडकॅप इंन्डेक्स आणि स्मॉलकॅपमध्येही अर्ध्या टक्क्यांची वाढ झाली आहे.
शेअर बाजाराची सुरवात आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्सची सपाट सुरुवात झाली. तर, निफ्टीत 40 अंकांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनंतर सेन्सेक्समध्ये 218.37 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीत 60.75 अंकांची घसरण झाली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 40 अंकांनी वधारला असून 55431 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 1.45 अंकांनी वधारला असून 16524.20 अंकांवर व्यवहार करत आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Reliance- 3.45
- Bajaj Finserv- 2.69
- Sun Pharma- 2.42
- HCL Tech- 2.14
- TCS- 2.02
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Apollo Hospital- 5.05
- Hero Motocorp- 3.43
- Eicher Motors- 1.74
- HDFC- 1.73
- Power Grid Corp- 1.59