मुंबई: अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरुन सकारात्मक संकेत येताच भारतीय शेअर बाजार चांगलाच वधारल्याचं दिसून येतंय. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,039 अंकांनी तर निफ्टीही 312 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.86 टक्क्यांची वाढ होऊन तो 56,816.65 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.87 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,975.30 वर पोहोचला आहे. 

आज 2241 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1105 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 96 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

रशिया-युक्रेनमध्ये शांतता चर्चा सुरु होण्याचे सकारात्मक संकेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमती यामुळे जगभरातील शेअर बाजारात स्थिरता येत असल्याचं दिसून येतंय. 

आज बाजार बंद होताना मेटल, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस, रिअॅलिटी या क्षेत्रातील शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली आहे तर ऑटो, , उर्जा, , बँक, फार्मा, FMCG सेक्टरच्या शेअर्समध्ये एक टक्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यांची वाढ झाली आहे. 

बुधवारी शेअर बाजारातील  UltraTech Cement, Axis Bank, Shree Cements, IndusInd Bank आणि Bajaj Auto या कंपन्यां टॉप निफ्टी गेनर्स ठरल्या तर Cipla, Sun Pharma, Tata Consumer Products आणि  Power Grid Corporation या कंपन्यां टॉप निफ्टी लूजर्स ठरल्या आहेत.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • UltraTechCement- 4.73 टक्के
  • Axis Bank- 3.68 टक्के
  • IndusInd Bank- 3.57 टक्के
  • Shree Cements- 3.49 टक्के
  • Bajaj Auto- 3.35 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Cipla- 1.15 टक्के
  • Sun Pharma- 0.27 टक्के
  • Power Grid Corp- 0.14 टक्के
  • TATA Cons. Prod- 0.10 टक्के

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha