मुंबई: शेअर बाजारात आजही काहीशी अस्थिरता दिसून आली असली तरी बाजार बंद होताना त्यामध्ये काहीशी वाढ झाली. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 214 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 42 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.37 टक्क्यांची वाढ होत तो 58,350 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,388 वर पोहोचला. जागतिक पातळीवर असलेल्या अस्थिरतेचे परिणाम आज शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आले. 


आज एकूण 1337 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1934 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली, तसेच 133 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. Tech Mahindra, TCS, Infosys, Asian Paints आणि Titan Company या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Maruti Suzuki, Sun Pharma, Tata Motors, Kotak Mahindra Bank आणि Coal India या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घट झाली. आज केवळ आयटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये काहीशी वाढ झाली. इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. 


रुपया 45 पैशांनी घसरला
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची 45 पैशाने घसरण झाली असून त्याची किंमत 79.16 इतकी झाली आहे.


शेअर बाजाराची सुरुवात
शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात (Share Market Opening Bell) झाली. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स (Sensex) 100 अंकांनी वधारत खुला झाला. तर निफ्टीने (Nifty) 17300 अंकांची पातळी ओलांडली. मात्र, काही वेळेनंतर बाजारात विक्रीचा दबाव दिसू लागल्याने घसरण सुरू झाली. एनएसईचा निफ्टी निर्देशांक 37.45 अंकांच्या तेजीसह 17,349.25 अंकांवर खुला झाला. तर, सेन्सेक्स 107.11 अंकांनी वधारून 58,174.11 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 182 अंकांच्या घसरणीसह 57,954.21 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 73.45 अंकांची घसरण दिसत असून 17,272.00 अंकावर व्यवहार करत होता.


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Tech Mahindra- 1.94 टक्के

  • Infosys- 1.46 टक्के

  • TCS- 1.45 टक्के

  • Titan Company- 1.32 टक्के

  • Asian Paints- 1.28 टक्के


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली



  • Maruti Suzuki- 2.33 टक्के

  • Sun Pharma- 2.21 टक्के

  • Kotak Mahindra- 1.78 टक्के

  • Tata Motors- 1.77 टक्के

  • Coal India- 1.46 टक्के