मुंबई : शेअर बाजारासाठी (Stock Market Update) आजचा दिवस सकारात्मक राहिला असून गुंतवणूकदारांचा चांगलाच फायदा झाल्याचं चित्र आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) असलेल्या सेन्सेक्समध्ये (Sensex) 551 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये (Nifty) 124 अंकांची वाढ झालेली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.88 टक्क्क्यांची वाढ होऊन तो 59,332 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.71 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,659 वर पोहोचला. जागतिक स्तरावर काही सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांचा खरेदीकडे असलेल्या ओढ्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. 


आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1772 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1530 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 138 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. Axis Bank, Bajaj Finance, HDFC, Tech Mahindra आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये आज वाढ झाली. तर Tata Consumer Products, Apollo Hospitals, ITC, Hindalco Industries आणि NTPC या कंपनीच्या निफ्टीमध्ये घट झाली. 


आज एफएमसीजी क्षेत्र सोडलं तर आज सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे. बँक, कॅपिटल गुड्स, आयटी, सार्वजनिक बँका या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.5 टक्क्यांची वाढ झालेली आहे. 


रुपया 12 पैशांनी घसरला
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 12 पैशांनी घसरली असून आज रुपयाची किंमत ही 79.63 इतकी आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात
शेअर बाजाराची सुरुवात आज सकारात्मक झाली. BSE सेन्सेक्स 503.16 अंकांच्या म्हणजेच, 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 59,320.45 वर उघडला. याशिवाय, NSE च्या निफ्टीनं 176.90 अंक किंवा 1.01 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,711.65 वर व्यापार सुरू केला आहे. 


या कंपन्याचे शेअर्स वधारले



  • Axis Bank- 2.69 टक्के

  • Bajaj Finance- 2.37 टक्के

  • HDFC- 2.36 टक्के

  • Tech Mahindra- 2.09 टक्के

  • TCS- 2.03 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • TATA Cons. Prod- 2.16 टक्के

  • Apollo Hospital- 1.94 टक्के

  • ITC- 1.59 टक्के

  • Hindalco- 1.50 टक्के

  • NTPC- 1.35 टक्के