Cidco Lottery 2025 नवी मुंबई: शहर व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोनं (Cidco) नवी मुंबईत एकूण 67 हजार घरांची उभारणी आणि त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यापैकी 26 हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना (My Choice Cidco Homes) आणली गेली होती. या योजनेद्वारे अर्ज नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. अर्ज नोंदणीसाठी चारवेळा मुदतवाढ दिली गेली होती. आता सिडकोच्या या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 30 जानेवारी  2025 सकाळी 11.00 वाजेपर्यंत आहे. म्हणजेच यासाठी काही तासांचा कालावधी बाकी आहे. सिडकोनं चार वेळा मुदतवाढ देऊन देखील बुकिंग शुल्क जमा करणाऱ्यांची संख्या मात्र अपेक्षेइतकी झाली नसल्याचं पाहायला मिळालं आहे. 


बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं?


सिडकोनं चारवेळा मुदतवाढ दिल्यानंतर बुकिंग शुल्क जमा करणाऱ्यांची संख्या मात्र समाधानकारक नसल्याचं दिसून येतं. सिडकोनं नवी मुंबईतील खारघर, वाशी ट्रक टर्मिनल,खांदेश्वर, तळोजा, पनवेल, कळंबोली बस डेपो, मानसरोवर रेल्वे स्टेशन, उलवे खारकोपर या भागातील 26 हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना आणली गेली होती. चारवेळा अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आहे.  28 जानेवारीपर्यंत 1 लाख 60 हजारांपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी केवळ 15 हजार अर्जदारांनी बुकिंग शुल्क सिडकोकडे जमा केल्याची माहिती आहे. 


सिडकोच्या नवी मुंबईतील घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर 15 घरांसाठी प्राधान्यक्रम नोंदवून बुकिंग शुल्क जमा करण्यासाठी 31 जानेवारी रात्री 11.30 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 


नोंदणी आणि बुकिंग शुल्क  जमा करण्याची मुदत संपल्यानंतर सिडकोकडून 3 फेब्रुवारी 2025 ला अर्जदारांची मसुदा यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. अर्जदारांची अंतिम यादी सिडकोच्या वेबसाईटवर 10 फेब्रुवारीला 2025 ला जाहीर केली जाईल. तर, सोडत 15 फेब्रुवारीला होणार आहे.


सिडकोडकडून घरांच्या किमतीचं समर्थन, अर्जदारांचा अपेक्षाभंग 


सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेसाठी सुरुवातीला अर्जनोंदणी करण्यास सांगितलं. मात्र, त्यावेळ घरांच्या किमती निश्चित करण्यात आलेल्या नव्हत्या. केवळ 236 रुपये जमा करुन नोंदणी शुल्क जमा करण्यास सांगण्यात आलं. सिडकोनं त्यानंतर घरांच्या किमती जाहीर केल्या आणि अर्जदारांचा हिरमोड झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांसाठी 25 लाख ते 48 लाख रुपयांच्या किमतीचं घर घ्यावं लागू शकतं. तर अल्प उत्पन्न गटातील सर्वाधिक घराची किंमत 97 लाख रुपयांपर्यंत होती. परिणामी अर्जदारांनी सिडकोच्या घरांच्या दरात कपात करण्याची मागणी केली. मात्र सिडकोनं घरांचे दर वाजवी असल्याचं सांगत किमती कमी करण्यास नकार दिला. परिणामी अर्जदारांचा अपेक्षाभंग होऊन अर्जदारांची संख्या कमी होण्यात झाला. 


सिडकोच्या घरांच्या किमती (रुपयांमध्ये):


गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )


तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख 
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख 
खारघर बस डेपो - 48. 3 लाख 
बामणडोंगरी -31. 9 लाख 
खारकोपर  2A, 2B -38.6 लाख 
कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 


अल्प उत्पन्न गट (एलआयजी) -


पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख 
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख 
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख 
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख 
खारकोपर ईस्ट - 40.3 लाख 
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख 
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख


इतर बातम्या : 


Cidco Homes Lottery 2025 : शेवटची संधी चुकवू नका, सिडकोच्या 26000 घरांच्या नोंदणीसाठी दोन दिवस बाकी