China Company Gifts Flats To Employees नवी दिल्ली: आज काल नोकरी किती दिवस राहील याबाबत कोणी ठामपणे सांगू शकत नाही. काही ठिकाणांहून कर्मचारी कपतीच्या बातम्या येतात. तर, काही ठिकाणांहून कर्मचाऱ्यांवर केला जाणारा खर्च कमी केला  जातो.मात्र, चीनच्या एका कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांचा फ्लॅट भेट देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Continues below advertisement

चीनमधील ही कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 18 फ्लॅट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फ्लॅटची किंमत  1.3 कोटी ते 1.50 कोटींदरम्यान आहे. हे प्लॅट कंपनीनं तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार कंपनीचा उद्देश कर्मचाऱ्यांना दीर्घ काळापर्यंत आपल्या सोबत राहावं आहे. यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना नवं कौशल्य स्वीकारण्यासाठी प्रेरणा देतेय. या कंपनीत एकूण 450 कर्मचारी काम करतात.  

Continues below advertisement

Zhejiang Guosheng कंपनीचा मोठा निर्णय  

Zhejiang Guosheng  ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देण्यात आली आहे. कंपनी वाहनांच्या पार्टसची निर्मिती करते. कंपनीच्या जनरल मॅनेजरनं कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ कंपनीत राहावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  

कंपनीच्या माहितीनुसार या वर्षी पाच कर्मचाऱ्यांना फ्लॅट देण्यात आले आहेत. पुढील वर्षी  8 कर्मचाऱ्यांना फ्लॅट दिले जाणार आहेत. तीन वर्षात एकूण 18 कर्मचाऱ्यांना फ्लॅट देण्याचं नियोजन आहे. या फ्लॅटचं क्षेत्रफळ 1076 ते 1615 चौरस फूट इतकं आहे. कंपनीचं 2024 मध्ये बाजारमूल्य 70 दशलक्ष डॉलर इतकं होतं.

फ्लॅट कधी मिळणार?

सर्व फ्लॅट औद्योगिक क्षेत्रापासून 5 किलोमीटर अंतरावर आहेत. कंपनीकडून कर्मचाऱ्यांकडून एक करार देखील घेतला जात आहे. ज्यासह फ्लॅटचं काम पूर्ण झाल्यानंतर ते कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर ते कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत.