Cheapest Gold Price :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दिवसें दिवस वाढ होताना दिसत आहे. जगभरात सोने अधिकाधिक महाग होत असले तरी, असे काही देश अजूनही आहेत जिथे सोने भारतापेक्षा स्वस्त मिळते. कर, आयात शुल्क, जीएसटी आणि उत्पादन शुल्क देशानुसार वेगवेगळे असतात. यामुळेच सोन्याच्या किमतीत लक्षणीय फरक दिसून येतो. दरम्यान, सर्वात जास्त स्वस्त सोने कोणत्या देशांमध्ये मिळते याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबबात सविस्तर माहिती.

Continues below advertisement

जगभरात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरी, असे काही देश अजूनही आहेत जिथे तुम्हाला भारतापेक्षाही स्वस्त सोने मिळू शकते. अलीकडील अहवालानुसार, जगातील सर्वात स्वस्त सोने खरेदीच्या बाबतीत  दुबई अजूनही अव्वल स्थानी आहे.

2026 मध्ये सर्वात स्वस्त सोन्याचे दर असलेले 10 देश खालीलप्रमाणे 

1. यूएई (दुबई)2. हाँगकाँग3. स्वित्झर्लंड4. सिंगापूर5. तुर्की6. इंडोनेशिया7. थायलंड8. कतार9. मलेशिया10. सौदी अरेबिया

Continues below advertisement

भारताचा क्रमांक कितवा?

विशेष म्हणजे, सर्वात स्वस्त सोन्याच्या किमती असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश नाही. याचे मुख्य कारण आयात शुल्क आणि जीएसटी आहे. भारतातील सोन्यावर आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी आकारला जातो. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत त्याची किंमत वाढते. भारतातील दागिन्यांची विविधता, विश्वासार्हता आणि पुनर्विक्री बाजारपेठ बरीच मजबूत मानली जाते. यामुळेच, जास्त किमती असूनही सोन्याची मागणी कमी राहते.

भारतीय खरेदीदार दुबईकडे का आकर्षित होतात?

भारतीय पर्यटकांमध्ये दुबईत सोने खरेदी करण्याची प्रथा खूप जुनी आहे. तिथे घडणावळीचे शुल्क कमी असते आणि सोन्याच्या शुद्धतेवर अधिक विश्वास असतो. शिवाय, दुबईमध्ये विविध प्रकारच्या डिझाइन्स उपलब्ध आहेत आणि कर कमी असल्यामुळे किमती कमी राहतात. म्हणूनच अनेक लोक लग्नाआधी किंवा मोठ्या गुंतवणुकीपूर्वी दुबईतून सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

परदेशातून स्वस्त सोने खरेदी करणे नेहमीच फायदेशीर ठरते का?

हे नेहमीच खरे नसते. परदेशातून सोने खरेदी करताना सीमा शुल्क, प्रवासाचा खर्च आणि भारतीय नियमांचा विचार करणे आवश्यक आहे. निर्धारित मर्यादेपलीकडे सोने आणल्यास मोठा कर लागू शकतो. शिवाय, केवळ स्वस्त आहे म्हणून सोने खरेदी करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. नेहमी हॉलमार्क असलेले बिल असलेल्या आणि विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच खरेदी करा. सोशल मीडियावरील लोकसुद्धा बनावट किंवा बिल नसलेले सोने खरेदी न करण्याचा सल्ला देतात.