Changes From 1st June 2023:  मे महिना संपण्यास आता काही तासच शिल्लक आहेत. पुढील महिन्यापासून, एक जूनपासून (Changes from 1st June 2023) अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे जून महिना सुरू होण्यापूर्वी कोणते बदल होणार आहेत आणि त्यांचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल, हे जाणून घ्या. 


एलपीजी गॅस दरात बदल होण्याची शक्यता LPG Gas Price 


सरकारी इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलतात. एलपीजी गॅसच्या किमती दर महिन्याच्या एका तारखेला निश्चित केल्या जातात. एप्रिल आणि मेच्या पहिल्या तारखेला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र, 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती.


सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल होणार? CNG PNG Rates 


एलपीजी गॅस प्रमाणे सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरात बदल होतो. एप्रिल महिन्यात मुंबई आणि दिल्लीत सीएनजी-पीएनजी दरात बदल झाला आहे. मे महिन्यात कोणताही बदल न होता, एप्रिलचे दर कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे एक जून रोजी सीएनजी-पीएनजी दरात कोणता बदल होतो का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


इ-बाईक्स महागणार E-Bikes Price Hike 


1 जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महागणार आहे. एक जूनपासून तुम्ही इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागणार आहे. 21 मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II अनुदानाच्या रक्कमेत घट केली आहे. अनुदानात 10,000 रुपये प्रति kWh इतकी घट करण्यात आली आहे. त्याच वेळी, पूर्वी ही रक्कम 15,000 रुपये प्रति किलोवॉट होती. यामुळे, बहुतेक इलेक्ट्रिक वाहने 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात.


रिझर्व्ह बँकेची मोहीम RBI 


एक जूनपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशभरातील बँकांमध्ये असणाऱ्या बेवारस, दावा न केलेल्या रक्कमेचा निपटारा करण्याची मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेचे नाव '100 दिवस 100 पेमेंट्स' असे ठेवण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना कळवले आहे. या मोहिमेअंतर्गत 100 दिवसांत वारस नसलेल्या, कोणताही दावा नसलेल्या बँक खात्यातील रक्कमेचा निपटारा केला जाणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: