Rice Export Duty : तांदूळ निर्यातीच्या (Rice Export) बाबातीत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2024 नंतरही तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं (Central governments) घेतला आहे. काल (21 फेब्रुवारी) नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 


वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न


पिकांच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. महागाई (Inflation) वाढू नये यासाठी धोरणं आखत आहे. देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं 25 ऑगस्ट 2023 ते 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत रिफाइन्ड तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. जो नंतर 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आला. या निर्यात शुल्काचा कालावधी वाढवण्यात आला आहे परंतू, तो किती काळ सुरु राहणार आहे, म्हणजेच सध्या ते अनिश्चित काळासाठी सुरु राहणार आहे, याची कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही.


अधिसूचना जारी 


दरम्यान, अर्थ मंत्रालयानं (Ministry of Finance) जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार, 31 मार्चनंतरही कोणत्याही अंतिम तारखेशिवाय 20 टक्के निर्यात शुल्क सुरु राहील, असे म्हटले आहे. तांदळाच्या पुरेशा साठवणुकीसह देशातील देशांतर्गत किंमती वाढू नयेत आणि मर्यादेपलीकडे जाऊ नयेत, यासाठी सरकारने आधीच उकळलेल्या तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के अतिरिक्त शुल्क लागू केले होते. याशिवाय 31 मार्चनंतरही पिवळ्या वाटाण्याची ड्युटी फ्री आयात सुरु ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. 


न शिजवलेला भात म्हणजे काय?


भातापासून तांदूळ काढण्याच्या प्रक्रियेत, प्रथम भात सालीसह उकळले जाते आणि नंतर तांदूळ वेगळे केले जातात. या तांदळाला उसना तांदूळ म्हणतात. या तांदळात जवळजवळ सर्व फायदेशीर घटक असतात जे ब्राऊन राईसमध्ये असतात. हा तांदूळ पारदर्शक असतो, शिजायला कमी वेळ लागतो आणि पचायलाही हलका असतो. उसना तांदूळ किंवा परबोइल्ड तांदूळ, ज्याला पश्चिम बंगालमध्ये उसना तांदूळ आणि भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पोन्नी तांदूळ म्हणूनही ओळखले जाते, हा अर्धवट पूर्व शिजवलेला भात आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं तांदळावरील निर्यात शुल्काचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी तो  किती काळ सुरु राहणार याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.  


महत्वाच्या बातम्या:


Bharat Rice : स्वस्त डाळीनंतर, आता स्वस्त तांदूळ! फक्त 29 रुपये किलोने मिळणार 'भारत तांदूळ'