Campa Cola is Back in Market: 70 च्या दशकातील सर्वात मोठा कोला ब्रँड, 'कॅम्पा कोला' (Campa Cola) पुन्हा एकदा नव्यान लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत 'कॅम्पा कोला' परत आला आहे. मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपनं (Reliance Group) हा स्वदेशी ब्रँड विकत घेतला आहे आणि तीन फ्लेवर्समध्ये लॉन्च केला आहे. या क्षेत्रात, पेप्सी, कोका-कोला आणि स्प्राईटसह इतर शीतपेय ज्यांनी आधीच बाजारपेठेत आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं आहे, त्यांना कॅम्पा कोलाकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं.


प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून अंबानींनी विकत घेतला होता ब्रँड  


रिलायन्सकडे (Reliance) मालकी आल्यानंतर कॅम्पा कोलानं (Campa Cola) पुन्हा एकदा बाजारात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये रिलायन्सनं कॅम्पा कोलाच्या अधिग्रहणाची घोषणा केली होती. आता टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स पुन्हा एकदा नव्या रुपात कॅम्पा कोला घेऊन बाजारात पोहोचले आहेत. रिलायन्सनं या ब्रँडसाठी दिल्लीस्थित प्युअर ड्रिंक ग्रुपसोबत (Pure Drink Group) करार देखील केला आहे.


कोला मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री


रिलायन्सचे चेअरमन (Reliance Chairman) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आपला रिटेल व्यवसाय वाढवत असताना एकामागून एक नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. या क्रमानं कॅम्पा कोलासोबत त्यांनी कोला मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी कॅम्पा कोला ब्रँड निवडला, जो 70 च्या दशकात अव्वल होता आणि प्युअर ड्रिंक्स ग्रुपशी सुमारे 22 कोटी रुपयांचा करार करून त्याची मालकी स्वतःकडे घेतली आहे. 


'द ग्रेट इंडियन टेस्ट' या स्लोगनमुळे चर्चित 


कॅम्पा कोला (Campa Cola) हा स्पार्कलिंग पेय श्रेणीतील भारताचा स्वतःचा ब्रँड आहे. पेये बनवणारा प्युअर ड्रिंक्स ग्रुप हा 1949 ते 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात कोका-कोलाचा (Coca Cola) एकमेव वितरक होता. प्युअर ड्रिंक्सनं स्वतःचा ब्रँड कॅम्पा कोला लाँच केला आणि कोका-कोला, पेप्सीने देशातून बाहेर पडल्यानंतर या क्षेत्रातील टॉप ब्रँड बनला. कंपनीनं कॅम्पा ऑरेंज हे केशरी रंगाचं शीतपेय बाजारात आणून आपला व्यवसाय वाढवला. त्यांचं 'द ग्रेट इंडियन टेस्ट' हे स्लोगन त्यावेळी खूप गाजलं होतं.


दिवाळीच्या मुहूर्तावर होणार होता लॉन्च 


रिलायन्ससोबत झालेल्या करारानंतर, कॅम्पा कोला पहिल्यांदाच गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर लॉन्च होणार होता. असं म्हटलं जात होतं की, दिवाळीपर्यंत त्याचे तीन नवे फ्लेवर भारतीय बाजारपेठेत लॉन्च होतील. दरम्यान, ते तेव्हा लॉन्च होऊ शकले नाही आणि आता होळीनंतर लगेचच, कंपनीनं ते ऑरेंज (Orange), लेमन (Lemon) आणि कोला (Cola) फ्लेवर्समध्ये सादर केले आहेत.