नवी दिल्ली : जानेवारी महिना संपून उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. गॅस सिलेंडर दर, यूपीआय व्यवहार, बँकिंग नियम, कारच्या किमती अशा सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टीमंध्ये बदल होणार आहेत. ते सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे.
एलपीजीच्या दरात बदल
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांचा आढावा घेतला जातो. सरकारी तेल कंपन्या बाजारातील स्थितीनुसार घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करतात. जानेवारीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घसरण झाली होती. 1 जानेवारीला दर वाढणार की कमी कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यूपीआयच्या नियमात बदल
यूपीआय नियमांमध्ये देखील बदल 1 फेब्रुवारीपासून होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार यूपीआयच्या व्यवहारांबाबत बदल कळवण्यात आले आहेत. जांच्या यूपीआय आयडीमध्ये विशेष कॅरेक्टर्स आहेत त्याद्वारे आर्थिक व्यवहार होणार नाहीत. अशा आयडीवरुन होणारे यूपीआय व्यवहार ब्लॉक केले जातील.
बँकिंग नियमांमधील बदल
कोटक महिंद्रा बँकेनं त्यांच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बँकिंग सेवा आणि शुल्कामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून फ्री एटीएम व्यवहार आणि बँकिंग सुविधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्यांचं खात कोटक महिंद्र बँकेत आहे त्यांना नियमांची माहिती घेणं आवश्यक आहे.
विमानाच्या इंधनाच्या दरात बदल
दर महिन्याच्या 1 तारखेला एअर टर्बाइन फ्यूलच्या दरांचा आढावा घेतला जातो. 1 फेब्रुवारीला त्याच्या दरात देखील बदल होण्याची शक्यता आहे. एअर टर्बाइन फ्यूलच्या दरात वाढ झाल्यास विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकी कारच्या किमतीत वाढ
जर तुम्ही नवी कार खरेदी करण्याचं नियोजन करत असाल तर मारुती सुझुकीच्या कारच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे हे तुम्हाला माहिती असावं. 1 फेब्रुवारीपासून काही कारच्या किमती वाढणार असल्याचं मारुती सुझुकी इंडियानं म्हटं आहे. अल्टो के 10, एस-प्रेसो सेलेरिओ, वॅगन आर, स्विफ्ट डिझायर, ब्रेझा, अर्टिगा, ईको, इग्निस, बलेनो, सियाज, एक्सएल 6, फ्रोंक्स इनविक्टो, जिम्नी, ग्रँड विटारा कारचा समावेश आहे.
इतर बातम्या :