(Source: Poll of Polls)
Silver Price : चांदीची खरेदी करावी की नको? दरानं गाठला नवा विक्रम, दर पावनेदोन लाखाच्या पुढे
दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. वाढत जाणाऱ्या सोन्या चांदीच्या किंमतीमुळं याची खऱेदी करावी की नको सा सवाल खरेदीदार उपस्थित करत आहेत.
Buldhana Silver Price : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. वाढत जाणाऱ्या सोन्या चांदीच्या किंमतीमुळं याची खऱेदी करावी की नको सा सवाल खरेदीदार उपस्थित करत आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या जरानं नवा विक्रम गाठला आहे. आज चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, चांदीचा दर 1 लाख 75 हजार 500 रुपये प्रति किलो झाला आहे.
आज चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. एक महिन्यात चांदीच्या भावात 55 हजार रुपये प्रति किलोंची वाढ झाली आहे. त्यामुळं आता चांदीची खरेदी करावी की नको असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षभरात चांदीचे भाव कधी आणि किती होते (Gold Silver Rate Update)
-07 Oct - 2024 - 88 हजार रु प्रति किलो.
-1 Jan - 2025 - 99 हजार 500 रु प्रति किलो.
-1 March 2025 - 1 लाख 01 हजार रु प्रति किलो.
-1 Jun 2025 - 1लाख 10 हजार रु प्रति किलो.
-1 Sept 2025 - 1 लाख 40 हजार रु प्रति किलो.
दिवसेंदिवस चांदीचे भाव वाढत असल्याने व आगामी सण आणि लग्नसराईच्या अनुषंगाने अनेकांचे बजेटही कोलमडल्याचं दिसत आहे. खामगाव येथील चांदीची बाजारपेठ ही देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे देशभरातून ग्राहक खामगाव येथे चांदी खरेदीसाठी येत असतात.
सोन्याचा दर वाढीचा विचार केला तर रशिया-युक्रेन युद्ध, इजरायल-गाजा युद्ध,अमेरिकन फेडरल बँकेने कमी केलेले व्याजदर, अमेरिकेत सुरू झालेले शट डाऊन, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, आपली गुंतवणूक सुरक्षित रहावी यासाठी अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी सुरू केली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने, सोन्याच्या दराने ही दर वाढीचे सगळे उच्चांक मोडले असल्याचं पाहायला मिळत आहे. तर एन दिवाळी आणि लगीन सराईच्या तोंडावर मोठी दर वाढ झाली असल्याने, सोने आणि चांदी खरेदीसाठी इच्छुक असलेल्या, सर्व सामान्य ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुढील काळात अजूनही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी दिला आहे. त्यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:




















