एक्स्प्लोर

4 लाखांच्या उत्पन्नावर शून्य कर, मग 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त कसं? तुमचा फायदा नेमका कुठे? जाणून घ्या सामान्यांना काय मिळणार?

New Tax Slab : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान नव्या कररचनेची घोषणा केली. या कररचनेनुसार 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

New Tax Slab : केंद्र सरकारने नवा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीचीही घोषणा करण्यात आली आहे. याच घोषणेनुसार आता 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर सीतारामन यांच्या या घोषणेचा नेमका अर्थ काय आहे? 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असले तरी तुम्हाला 4 लाख रुपयांच्या पुढच्या उत्पन्नावर कर कसा लागू शकतो? हे जाणून घेऊ या... 

नवा टॅक्स स्लॅब नेमका काय आहे?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात कररचनेत बदल केल्याचे सांगितले आहे. नव्या कररचनेनुसार आता 0 ते 4 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसेल. त्यानंतर चार ते आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के कर द्यावा लागेल. 8 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर द्यावा लागेल. 12 ते 16 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के कर आकारला जाईल. 16 ते 20 लाख उत्पन्न असेल तर करदात्याला 20 टक्के उत्पन्न द्यावे लागेल. 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर करदात्याला 25 टक्के कर द्यावा लागेल. त्यानंतर 24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर नागरिकांना 30 टक्के कर द्यावा लागेल. 

सामान्यांना नेमका काय फायदा होणार? 

आता नव्या कररचनेप्रमाणे 4 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही कर देण्यास पात्र ठरता. मात्र तुमचे उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असले तरी रिबेटच्या फायद्यामुळे तुमचा कर माफ होईल. नव्या कररचनेनुसार करदात्यांना 75 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचाही लाभ मिळणार आहे. त्यानंतरच्या उत्पन्नावर मात्र तुम्हाला कर द्यावा लागेल. म्हणजेच तुमचे उत्पन्न समजा 15 लाख रुपये असेल तर तुम्हाला नव्या टॅक्स स्लॅबनुसार कर द्यावा लागेल.  

15 लाख रुपये उत्पन्न असल्यास किती कर द्यावा लागेल? 

तुमचे 15 लाख रुपये आहे. तर नव्या कररचनेनुसार तुमच्या उत्पन्नावर तुम्हाला 15 टक्क्यांनी कर द्यावा लागेल. म्हणजेच पहिल्या 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के याप्रमाणे 20 हजार रुपये कर द्यावा लागेल. त्यांतर 8 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला 10 टक्के याप्रमाणे 40 हजार कर द्यावा लागेल. आणि उरलेल्या 3 लाख रुपयांवर तुम्हाला 15 टक्क्यांच्या हिशोबाने 45 हजार रुपये कर द्यावा लागेल. म्हणजेच तुमचे उत्पन्न 15 लाख रुपये असेल तर तुम्हाला एकूण 1 लाख 5 हजार रुपये कर म्हणून द्यावे लागतील. हा कर 75 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनला वगळून आहे. 75 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन गृहित धरल्यास तुम्हाला एकूण 97,500 रुपये कर द्यावा लागेल.  

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स  (12 लाख 76 हजार रुपये उत्पन्न असल्यास लागू होणार)

0 ते 4 - Nil
4 ते 8- ५ टक्के
8 ते 12 लाख - 10 टक्के
12 ते 16 लाख - 15 टक्के
16 ते 20 लाख - 20 टक्के
20 ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखापुढे - 30 टक्के

हेही वाचा :

Income Tax Calculator : नव्या टॅक्स रिजीममध्ये 10 ते 50 लाखांदरम्यान उत्पन्न, 2025-26 मध्ये किती प्राप्तिकर भरावा लागेल? 

Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे

Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget