Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. कररचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागणार आहे. मध्यमवर्गाला स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात जाहीर केली. युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची घोषणा सीतारमण यांनी केली. 2047 पर्यंत भारताला विकसीत भारत करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. आयुष्मान भारत योजना यापुढे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही लागू असणार आहे. लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटी करण्यात आलंय.
1 कोटी नागरिकांना 300 यूनिट मोफत वीज
पंतप्रधान सूर्योदय योजने अंतर्गत 300 युनीट वीज मोफत मिळणार आहे. तसेच या योजनेंतर्गत 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यात येणार आहे.
43 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप
गेल्या 10 वर्षात पीएम मुद्रा योजनेंतर्गंत मोदी सरकारने गरीबांना, शेतकऱ्यांना, महिला आणि युवकांना अनेक सुविधा उपलब्ध मोदींनी दिल्या आहेत. गेल्या दहा वर्षात पीएम मुद्रा योजनेंतर्गंत 43 कोटीच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. आतपर्यंत 22.50 लाख कोटी नागरिकांना याचा फायदा झाला आहे.
PM AWAS योजनेंतर्गत 70 टक्के महिलांना मिळाली पक्की घरे
दहा वर्षात महिलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. दहा वर्षात पंतप्रधान PM AWAS योजनेंतर्गत 70 टक्के महिलांना घरे देण्यात आले आहे. ग्रामीण भागात या योजनेचा 70 टक्के महिलांना लाभ झाला आहे.
पंतप्रधान आवास योजनेतर्गत तीन कोटी घर
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तीन कोटी घर बनण्यात आली आहे. पुढील पाच वर्षात आणखी दोन कोटी घरे बनवण्यात येणार आहे. सर्वाईकल कॅन्सरच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून काम सुरू आबे. मुलींसाठी नवा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
skill India मार्फत 1.4 कोटी युवकांना प्रशिक्षण
स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आल आहे. या मिशन अंतर्गत 20 मंत्रालयांनी देशात विविध योजना सुरू केल्या.
पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास
पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास झाला आहे. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.
देशातील 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा फायदा
देशातील 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा फायदा झाला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे.
हे ही वाचा :
Lakhpati Didi Scheme : अर्थसंकल्पात उल्लेख झालेली लखपती दिदी योजना नेमकी काय? कोणत्या महिला त्याचा फायदा घेऊ शकतात?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI