Budget 2024: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) गुरुवारी (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहेत. करदाते, शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या  घोषणा केल्या जाऊ शकतात. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, मोदी सरकारनं अनेक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भांडवली खर्चासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती, जेणेकरून देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येतील. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून जनतेसाठी काय बाहेर पडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


अर्थ मंत्रालयानं अर्थसंकल्पापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एक अहवाल जारी केला आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल आणि यासह भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा दावा करण्यात आला आहे. जगातील इतर देशाबाबत बोलायचं झालं तर, भारताचा शेजारी असलेल्या चीनची अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर, सर्वात पहिल्या क्रमांकावर जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका आहे. अशातच चिनी ड्रॅगनचं वर्षाचं बजेट किती असतं? जाणून घेऊयात सविस्तर... 


चीनतं गेल्या वर्षाचं बजेट 3.4 अमेरिकन डॉलर


2023 मध्ये चीनचं सर्वसाधारण बजेट 3.4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं होतं आणि खर्च 27.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका निर्धारित करण्यात आला होता. चीन आपल्या बजेटचा सर्वात मोठा भाग संरक्षण आणि पायाभूत सुविधांवर खर्च करतो. 2023 मध्ये चीनचं संरक्षण बजेट 227.8 अब्ज डॉलर ठेवण्यात आलं होतं, जे 2022 च्या तुलनेत 7.2 टक्के जास्त होतं. दरम्यान, चीन अजूनही संरक्षण क्षेत्रात अमेरिकेपेक्षा खूपच कमी पैसा खर्च करतो. 2023 मध्ये अमेरिकेचं संरक्षण बजेट 797.7 अब्ज डॉलर होतं. 


105.9 बिलियन डॉलर कर्ज केलंय चुकतं 


याव्यतिरिक्त चीननं 2023 मध्ये 105.9 बिलियन डॉलर कर्ज चुकतं केलं आहे. जे गेल्या वर्षापासून 10.8 टक्क्यांहून अधिक होतं. या दरम्यान सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी चीनचं बजेट 48.1 बिलियन डॉलर होतं. यामध्ये 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. 


पब्लिक सर्विस बजेटमध्ये कपात 


पब्लिक सिक्योरिटीसाठी चीनचं बजेट 30.6 बिलियन डॉलर होतं, जे 2022 च्या बजेटपेक्षा 6.4 टक्के जास्त होतं. तसेच, गेल्या वर्षी चायना पब्लिक सर्व्हिसच्या बजेटमध्ये 0.7 टक्के कपात करण्यात आली होती. 2023 मध्ये सार्वजनिक सेवा बजेट 23 अब्ज डॉलर होतं.


ड्रॅगन शिक्षणावर किती खर्च करतो?


एवढंच नाही तर शेजारील देशाचे शैक्षणिक बजेट 2023 मध्ये 22.8 अब्ज रुपये होतं, जे 2022 च्या बजेटपेक्षा 2 टक्के जास्त होते. तसेच, डिप्लोमेसीसाठी चीनचं बजेट 8 अब्ज डॉलर्स होतं, जे मागील बजेटपेक्षा 12.2 टक्के अधिक होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Union Budget 2024: मोदी सरकारच्या पेटाऱ्यातून जनतेला सरप्राईजेसची अपेक्षा; आजच्या अर्थसंकल्पात 'या' मोठ्या घोषणांची शक्यता?