Maharashtra Budget 2026: महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (FM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीच्या (Loan Waiver Scheme) निर्णयाची घोषणा केली. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी समिती गठीत केली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले. 

Continues below advertisement

कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजन केल्या जात आहेत, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचे काय झाले, असा जाब विचारत होते. निवडणूक झाल्यानंतर सरकार शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन विसरले, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करुन विरोधकांच्या या टीकेतील हवा काढून घेतली आहे. मात्र, ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार, याचे निकष आणि तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे. 

Continues below advertisement

Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र ठरणार? 

- दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी. - ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील. - 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.- नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ. 

Maharashtra Budget 2026: शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा 

गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणारपाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहेचारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहेशेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहेअॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहेचार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातीलआगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवातगोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल

आणखी वाचा

Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा