नवी दिल्ली : नव्या कररचनेत मोठ्या बदलांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) जाहीर केला. 48 लाख 20 हजार 512 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, असे म्हणतफडणवीसांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. देशाचा अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामाजिक कल्याणच्या विकासाचा दर महागाई दरापेक्षा जास्त आहे. आरोग्य क्षेत्रातला खर्च दुप्पट झालं आहे. या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट केली आहे. मोठी गुंतवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने apprenticeship scheme सुरू केली त्याच धर्तीवर केंद्र सरकारने देखील याची घोषणा केली.रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रामविकास क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. 11 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. मुद्रा लोन 10 लाख वरून आता 20 लाख पर्यंत वाढवण्यात आलं आहे. इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीय कुटुबांना फायदा होणार आहे. केवळ घोषणा न करता भविष्याचा वेध घेत ही घोषणा करण्यात आली.
विरोधकांनी राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस
विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो ते तुमच्या समोर आहे. माझा विरोधकांना सल्ला आहे फक्त नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका. महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी मिळाल्या आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांनी उधळली स्तुतीसुमनं
कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि 'विकसित भारत' संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Devendra Fadnavis on Union Budget 2024 : भारतीय अर्थव्यवस्थेत 8.2 टक्क्यांची वाढ
हे ही वाचा :
Union Budget 2024-25: मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? वाचा सगळी माहिती एका क्लिकवर