एक्स्प्लोर

Agriculture Budget 2025 : पीएम किसान योजनेची रक्कम 6000 वरुन 10 हजार होणार? बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार?

Agriculture Budget : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पीएम किसानची रक्कम वाढणार का याकडे देखील सर्वाचंं लक्ष लागलंय.

Agricultre Budget, Budget 2025 नवी दिल्ली  : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात सादर करणार आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं योगदान महत्त्वाचं राहिलं आहे. कृषी क्षेत्रातून मोठ्या लोकसंख्येला रोजगार दिले जातात. कृषी क्षेत्राचा वाटा देशाच्या अर्थव्यवस्थेत इतर क्षेत्रांच्या तुलनेत कमी झाला आहे. कृषी क्षेत्राला अर्थसकंल्पात काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार का याकडे देखील सर्वाचंं लक्ष लागलं आहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांना देखील संपूर्ण कर्जमाफीची गरज असल्याचं म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज : डॉ. अजित नवले

उद्योगपतींना १३ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आता शेतकऱ्यांना देखील संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे, असं डॉ. अजित नवले यांनी म्हटलं आहे. यासोबतच विविध खतांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देणे गरजेचे आहे. मागील काळात ही सबसिडी कमी करण्यात आली आहे. यासोबतच जीएसटीच्या जाचातून विविध शेती संदर्भातील साधने आणि संसाधने यांना वगळलं पाहिजे ही आमची मागणी आहे, असं अजित नवले म्हणाले. 

पीएम किसानच्या रकमेत वाढ होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजना जाहीर केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्यांमध्ये 36000 रुपये देण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये वाढलेल्या महागाईचा विचार करुन पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 6 हजारांवरुन  10  हजार रुपये केली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढणार?

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाख रुपये केली जाणार का हे देखील पाहावं लागेल. कृषी क्षेत्रातील उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देऊ शकते. शेतकऱ्यांसाठी 1.75 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पातून अपेक्षित आहे. जी गेल्या वर्षापेक्षा 15 टक्के अधिक आहे. कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर देखील सरकार भर देऊ शकते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी तरतूद अपेक्षित आहे. 
 
कृषी क्षेत्राचा जीडीपी वाटा वाढणार?

देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमी झाला असला तरी रोजगार मोठ्या प्रमाणात यामधून मिळतात. यावेळी सरकार  शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी काय घोषणा करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या : 

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा! केंद्र सरकारनं महाराष्ट्राला यंदा तरी न्याय द्यावा : रोहित पवार 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget