Blinkit News : काही तासातच 2023 हे वर्ष संपून नवीन वर्ष 2024 सुरू होईल. या वर्षी अनेक गोष्टींची चर्चा झाली. अलीकडेच स्विगीने सांगितले होते की, यावर्षी लोकांनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपवरून जास्तीत जास्त बिर्याणी ऑर्डर केली आहे. अशातच आता ब्लिंकिटने (Blinkit) देखील यावर्षी कोणत्या वस्तूंची किती ऑर्डर झाली याबाबतची माहिती दिली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, यावर्षी ब्लिंकिटवर कंडोम, लायटर आणि पार्टी स्मार्ट टॅब्लेटसाठी सर्वाधिक ऑर्डर्स मिळाल्या आहेत.


यावर्षी ऑनलाइन किराणा डिलिव्हरी अॅप ब्लिंकिटवरून लोकांनी सर्वाधिक काय ऑर्डर केले याची आकडेवारी दिली आहे. यावर्षी ब्लिंकिटकडून मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी केले आहेत. तसेच 65973 लायटर ऑर्डर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ब्लिंकिटच्या संस्थापकाच्या मते, हे खरेदीदारांच्या सवयींमध्ये सामाजिक बदल दर्शवते. याबाबतची आकडेवारी त्यांनी शेअर केली आहे. माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने या संपूर्ण वर्षात ब्लिंकिटवरून 9,940 कंडोम ऑर्डर केले आहेत. 


65 हजार लाइटर आणि टॉनिक पाणी


‘ब्लिंकिट ट्रेंड्स 2023’ च्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये गुरुग्रामने 65,973 लाइटरची ऑर्डर दिली, तर शहरात यावर्षी थंड पाण्यापेक्षा जास्त टॉनिक वॉटर (कार्बोनेटेड पेय) ऑर्डर केले. या वर्षी अंदाजे 30,02,080 PartySmart गोळ्या (मद्यपान केल्यानंतर सकाळी हँगओव्हर टाळण्यासाठी) ऑर्डर करण्यात आल्या आहेत. बंगळुरुमधील कोणीतरी एका ग्राहकाने 1,59,900 रुपये किमतीचा आयफोन 15 प्रो मॅक्स ऑर्डर केला आहे.


मोठ्या प्रमाणात मॅगी पॅकेट्सची ऑर्डर 


यावर्षात मोठ्या प्रमाणात मॅगी पॅकेट्सची ऑर्डर करण्यात आली आहे. सुमारे 3,20,04,725 मॅगी पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. एका ग्राहकाने एका ऑर्डरमध्ये 101 लिटर मिनरल वॉटर खरेदी केले होते. यावर्षी ब्लिंकिटच्या माध्यमातून 80,267 पाण्याच्या बाटल्याही मागवण्यात आल्या आहेत. या वर्षी “सुमारे 351,033 प्रिंटआउट्स सकाळी 8 वाजेपूर्वी वितरित करण्यात आले. तसेच 1,22,38,740 आईस्क्रीम आणि 8,50,011 आइस क्यूब पॅकेटसह 45,16,490 एनो पाऊचची ऑर्डर देण्यात आली. याशिवाय ब्लिंकिटकडून एका महिन्यात एका ग्राहकाने 38 अंडरवेअर ऑर्डर केल्या आहेत. 


यंदा बिर्याणीला लोकांची मोठी पसंती


भारतात मिळणारी  बिर्याणी (Biryani) ही जगात प्रसिद्ध आहे. भारतीय पदार्थांमध्ये बिर्याणीला दरवर्षी सर्वाधिक मागणी असते, यंदाही हे सिद्ध झालं आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीवर 4.3 लाख बिर्याणी ऑर्डर करण्यात आली होती, तर 83 हजार नूडल्सची ऑर्डर देण्यात आली होती. स्विगीच्या मते, बिर्याणी ही सलग आठव्या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश आहे. 2023 मध्ये प्रत्येक सेकंदाला 2.5 बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली, त्यापैकी प्रत्येक 5.5 चिकन बिर्याणीमागे एक व्हेज बिर्याणीची ऑर्डर होती. बिर्याणीची ऑर्डर करणारे 24.9 लाख लोक स्विगी प्रथमच वापरणारे होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Swiggy Update: सलग आठव्या वर्षी खवय्यांची बिर्याणीला सर्वाधिक पसंती! गुलाबजामने रसगुल्ल्याला टाकलं मागे