Gold Rate : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसात सोन्याच्या दरानं (Gold Rate) मोठी गगनभरारी घेतली आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 77 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी ग्राहकांनी सोन्याच्या खेरदीकडं पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे.
फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात केलेली कपात, सोबतच मध्य पूर्वेतील भूराजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मात्र, या वाढीमुळं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. सोनं खरेदी करावं की नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, सातत्यानं सोन्या चांदीचे दर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
एका बाजूला सोन्याचे दर वाढत असतानाच चांदीच्या दरात देखील वाढ झालीय. चांदीचे दर प्रतिकिलो 90000 रुपयांच्या पातळीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, वर्षअखेरीस सोन्याचा भाव 80 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. फेडने पॉलिसी रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. चालू वर्षात आणखी 50 बेसिस पॉइंट्सची कपात करायची आहे. त्यामुळे सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात मिळणार चांगला परतावा
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर लगेच दिसून येत आहे. तेव्हापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता
येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणीही वाढते. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे या सणासुदीतही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतील. या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी त्यांना आशा आहे.
महत्वाच्या बातम्या: