मुंबई : प्रत्येक पालकाला आपण आपल्या मुलाचं भविष्य सुकर आणि सुरक्षित करावं, असं वाटतं. त्यासाठी पालकांचे मूल जन्मल्यापासून प्रयत्न चालू होतात. जगातलं सगळं सुख बाळाच्या पायाशी असावं, म्हणून आई-वडील दिवसरात्र मेहनत करत असतात. मात्र स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुमचा आपत्य 18 वर्षांचं झाल्यानंतर ते करोडपती होऊ शकतं. ते कसं शक्य आहे, हे जाणून घेऊ या..
म्युच्यूअल फंडाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलासाठी सुरक्षित अशी गुंतवणूक करू शकता. हीच गुंतवणूक भविष्यात त्याच्या मतदीला येऊ शकते. तुमचा मुलगा भविष्यात थेट करोडपती होऊ शकतो.
म्युच्यूअल फंड नेमकं काय करू शकतो?
म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये लहान बाळाचे भवितव्य सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळे फंड्स आहेत. मुलांचे भवितव्य लक्षात घेऊनच अशा फंड्सची रचना करण्यात आलेली आहे. आई-वडील झालेले किंवा भविष्यात आई-वडील होणारे पालक या फंडात बाळासाठी गुंतवणूक करू शकतात. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या फंडात तुम्ही प्रत्येक महिन्यालादेखील किंवा एकरमकी गुंतवणूक करू शकता.
मुलं कसे होणार करोडपती?
म्युच्यूअल फंडात अनेक चाईल्ड फंड एसआयपी उपलब्ध आहेत. याच एसआयपीच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठी गुंतवणूक करू शकता. ते कसे शक्य आहे हे एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड या म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून समजून घेऊ. हा फंड 2001 साली लॉन्च झाला होता. या फंडाने वर्षाला 20 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. समजा तुम्ही तुमच्या मुलासाठी वर्षाला 10 हजार रुपये गुंतवणूक करण्यास तयार असाल तर आगामी 20 वर्षांनंतर तुम्हाला 1.55 कोटी रुपये मिळतील. या फंडात तुम्ही 500 रुपये महिन्याप्रमाणेही गुंतवणूक करू शकता. तुमच्या गुंतवणुकीनुसार तुम्हाला हा फंड पैसे देतो.
मुलाला एकूण 1.22 कोटी रुपये मिळतील
ICICI चा प्रूडेंशियल चाइल्ड केअर फंड हादेखील अशाच प्रकारे काम करतो. या फंडाने वर्षाला साधारण 15.90 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलीसाठी प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुमचा मुलगा 20 वर्षांचा होईपर्यंत तुमच्या मुलाला एकूण 1.22 कोटी रुपये मिळतील. तुम्ही या फंडात अगदी 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करू शकता.
टाटा यंग सिटिझन्स फंडदेखील तुम्हाला अशाच प्रकारे रिटर्न्स देऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलासाठी महिन्याला 10 हजार रुपये गुंतवत असाल तर 20 वर्षांत तुमच्या मुलाला एकूण 1.02 कोटी रुपये मिळतील. हा फंड 1995 साली लॉन्च झाला होता. या फंडाने वर्षाला 13.20 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
बापरे बाप...मुंबईतल्या वरळीत एका घराची किंमत तब्बल 105 कोटी, सुविधा वाचून व्हाल थक्क!