India Mulls For New Banks : जवळजवळ एक दशकानंतर, देशांतर्गत दीर्घकालीन विकासाची गती वाढविण्यासाठी बँकिंग क्षेत्र (Banking sector) कसे वाढवायचे यावर अर्थ मंत्रालय आणि आरबीआय यांच्यात चर्चा सुरू आहे. यानंतर, भारतात लवकरच नवीन बँकांसाठी परवाने जारी केले जाणार आहेत. याबाबतची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे. देशात दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी बँकिंग क्षेत्राचा विस्तार कसा करायचा याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे.

Continues below advertisement


नवीन बँकांसाठी परवाने जारी केले जाणार


अहवालानुसार, येत्या काही दशकांमध्ये देशाच्या महत्त्वाकांक्षी विकास योजना पूर्ण करण्यासाठी सरकार आणि केंद्रीय बँकेत अनेक पावले उचलण्याची चर्चा आहे. त्यापैकी एक म्हणजे अधिकाधिक मजबूत बँकांसाठी मार्ग मोकळा करणे. यामध्ये, मोठ्या कंपन्यांना शेअर होल्डिंगवर बंदी घालून बँक परवान्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याचा पर्याय देखील विचारात घेतला जात आहे. याशिवाय, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना पूर्ण बँकिंग सेवांमध्ये रुपांतरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर चर्चा आहे. तसेच, परदेशी गुंतवणूकदारांसाठी सुविधांचा विचार केला जात आहे. आरबीआय किंवा केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु त्याची प्रतिक्रिया बाजारात स्पष्टपणे दिसून येते. सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान 0.8 टक्क्यांनी घसरलेला निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक दुपारच्या व्यवहारात 0.5 टक्क्यांनी वाढला. या वर्षी तो सुमारे आठ टक्क्यांनी वाढला आहे.


2014 नंतर देशात कोणासाही बँक परवाना दिला नाही


2014 नंतर देशात कोणासाही बँक परवाना जारी करण्यात आला नाही. अहवालात म्हटले आहे की 2016 मध्ये अनेक औद्योगिक आणि व्यावसायिक घराण्यांनी बँक परवान्यासाठी परवाना मागितला होता. परंतू, आता त्यावर पुनर्विचार केला जात आहे. व्यावसायिक घराण्यांना बँका उघडण्याची परवानगी देणे हा एक संवेदनशील आणि मोठा निर्णय असल्याचं बोललं जात आहे. 


दरम्यान, बँकिंग क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र सरकार तब्बल 10 वर्षानंतर मोठा निर्णय घेणार आहे. यामुळं अधिकाधिक बँकिंग क्षेत्र मजूबत होणार आहे. मोठ्या कंपन्यांना शेअर होल्डिंगवर बंदी घालून बँक परवान्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याचा पर्याय देखील विचारात घेतला जात आहे. देशात दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी बँकिंग क्षेत्राचा विस्तार कसा करायचा याबाबत देखील अर्थ मंत्रालयाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी चर्चा सुरु आहे.


महत्वाच्या बातम्या:


बँकेत नोकरीची मोठी संधी, 2500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?