एक्स्प्लोर

Bank Strike : सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 

Bank Strike : देशातील बँकांचे कर्मचारी विविध कारणांसाठी आज संपावर आहेत. 5 दिवसांचा कामाचा आठवडा असावा, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांची आहे.  

नवी दिल्ली : तुम्हाला जर बँकेत एखाद्या कामानिमित्त जायचं असेल तर आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. बँक कर्मचारी एक दिवसाच्या संपावर असल्यानं आज बँका बंद राहण्याची शक्यता आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स यांच्याकडून देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. यामुळं बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. यानंतर शनिवारी (12 सप्टेंबर ) आणि रविवारी (13 सप्टेंबर) रोजी बँकांना सुट्टी असेल. काही राज्यांमध्ये  लोकांना बँकेतील काम पर्ण करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. कारण काही ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी सोमवारी आणि मंगळवारी बँका बंद राहतील.  

बँक कर्मचारी कोणत्या कारणानं संपावर?

UFBU नं बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसदर्भातील मागण्यांसाठी संपाची घोषणा केली आहे. यामधील प्रमुख मागणी म्हणजे बँका शनिवारी आणि रविवारी पूर्ण बंद राहाव्यात. म्हणजेच आठवड्यात फक्त 5 दिवस कामकाज सुरु असावं. कामगिरी आधारित प्रोत्साहन योजनेचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी आहे. पहिल्यांदा निश्चित करण्यात आलेल्या पेन्शन सुधारणा आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्या संदर्भातील तरतुदी लागू कराव्यात, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांची आहे.     

बँक कर्मचारी यूनियन्सकडून मागण्या मान्य झाल्यास  28 ते 30 सप्टेंबरदरम्यान 3 दिवसांच्या देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. याशिवाय 26 ऑक्टोबर 2026 पासून बेमुदत संप सुरु करु असा इशारा बँक कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे. 

बँकांना सलग चार दिवस सुट्टी असली तरी आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन बँकिंगद्वारे पैसे पाठवता येऊ शकतात. एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरु असेल. याशिवाय यूपीआयद्वारे देखील पैसे पाठवता येऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेनं ग्राहकांना संपाबाबत माहिती दिली आहे.   

बँक खातेदारांना कोणाला पैसे पाठवायचे असतील तर   IMPS, NEFT, RTGS  आणि UPI ( GPay, PhonePe, Paytm) सेवा 24 तास सुरु असतील. वीज बिल, पाणी, गॅसचे बिल भरणे किंवा मोबाइल रिचार्ज करायचा असेल, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपचा वापर केला जाऊ शकतो. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget