Repo Rate : गुड न्यूज, आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पतधोरण जाहीर करताना सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. तीन पतधोरणात मिळून 1 टक्के रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काल पतधोरण जाहीर करत रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केली. यामुळं रेपो रेट 5.50 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं निर्णय घेतल्यानंतर आता बँकांकडून व्याज दरात कपात करण्यात आली आहे.पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया यासह विविध बँकांकडून व्याज दरात कपात करण्यात आली आहे. यामुळं कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल तर ज्यांची कर्ज अगोदरपासून सुरु आहेत त्यांचा ईएमआय कमी होईल.
शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडियाकडून व्याज दर कपात जाहीर करण्यात आली आहे. इंडियन बँक आणि करुर वैश्य बँक या बँकांकडून देखील व्याज दरात कपात केली. यामुळं बँकांकडून देण्यात येणाऱ्या गृहकर्जाचा ईएमआय कमी होईल.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेकडून आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकेनं रेपो लिंक्ड लेंडिंग रेट्समध्ये कपात केली आहे. हा दर आता 8.85 टक्क्यांवरुन 8.35 टक्क्यांवर आला आहे. बँकेनं एमसीएलआर आणि बेस रेटसमध्ये बदल केलेला नाहीत. नवे दर 9 जूनपासून लागू होणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेचा स्टॉक 110.15 रुपयांवर पोहोचला आहे.
बँक ऑफ इंडियाकडून व्याज दरात कपात
बँक ऑफ इंडियानं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार रेपो रेटमध्ये कपात होताच रेपो बेस्ड लेंडिंग रेटमध्ये 6 जूनपासून बदल केले आहेत. कपातीनंतर आरबीएलआर 8.85 टक्क्यांवरुन 8.35 टक्क्यांवर आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकमध्ये 124.3 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
करूर वैश्य बँकेनं व्याजदर घटवले
करुर वैश्य बँकेकडून मर्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. बँकेंकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 6 महिन्यात एमसीएलआर आणि 12 महिन्यात एमसीएलरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 6 महिन्यात एमसीएलआर 9.9 टक्के आणि एक वर्षासाठी 9.8 टक्के करण्यात आलं आहे. गेल्या 1 वर्षात एमसीएलआर 10 टक्क्यांवरुन घटवून 9.8 टक्के केले आहेत.
इंडियन बँक
आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर इंडियन बँकेनं बेचमार्क रेटमध्ये दुरुस्ती केली आहे. रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेटसमध्ये 8.7 टक्क्यांवरुन कपात कर करुन 8.2 टक्के केलं आहे. नवे दर 9 जून पासून लागू होतील.


















