Bank Interest Rate: अनेकजणांना अचानक पैशांची गरज लागते. अशी अचानक गरज लागल्यास ते विविध बँकातून (Bank) कर्ज घेतात. अनेक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदर (Interest Rate) आकारले जातात. याचा मोठा फटका ग्राहकाला बसतो. त्यामुळ आज आम्ही तुम्हाला सर्वात कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या बँकांच्या संदर्भातील माहिती सांगणार आहोत. या बँकातून कर्ज घेणे सामान्य ग्राहकाला परवडते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 
  
आम्ही तुम्हाला अशा टॉप-5 बँकांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज देत आहेत. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर वैयक्तिक कर्ज हा एक उत्तम पर्याय आहे. हे असुरक्षित कर्ज आहे. अशा परिस्थितीत त्याचे व्याजदर गृहकर्ज आणि कार कर्जापेक्षा जास्त आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांबद्दल सांगत आहोत, ज्या स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज देत आहेत.


HDFC Bank


HDFC बँक 40 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 3 ते 72 महिन्यांच्या कालावधीसाठी 10.75 टक्के ते 24 टक्के व्याज आकारते. बँक प्रोसेसिंग फी म्हणून ही बँक ग्राहकांकडून 4999 रुपये देखील आकारते. 


स्टेट बँक ऑफ इंडिया 


स्टेट बँक ऑफ इंडिया केवळ 11.15 टक्के प्रास्ताविक दराने 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहे.


ICICI बँक


ICICI बँक वैयक्तिक कर्जावर ग्राहकांकडून 10.65 टक्के ते 16 टक्के व्याज आकारत आहे. याशिवाय ग्राहकांना कर्जाच्या 2.50 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल.


कोटक महिंद्रा बँक


कोटक महिंद्रा बँक  50,000 ते  40 लाखां रुपयापर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी 10.99 टक्के दराने वैयक्तिक कर्ज देत आहे. यासोबतच बँक कर्जाच्या रकमेच्या 3 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून आकारत आहे.


पंजाब नॅशनल बँक


सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. ही बँक 12.75 टक्के ते 17.25 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.


महत्वाच्या बातम्या:


Bank FD Rates : 'या' सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ, एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर; यादी पाहा