Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारीला अगदी थाटामाटात अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा संपन्न झाला. देशभरात या सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढलं आहे. दरवर्षी अयोध्येत 5 कोटी पर्यटक येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं 2 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 


एका अहवालानुसार, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये पुढील 5 वर्षांत दीड ते दोन लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणात पर्यटक अयोध्येत दाखल होत आहेत. आर्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं अयोध्येला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळं या माध्यमातून अयोध्येत मोठ्य प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. 


पाच वर्षांत 1,50,000 ते 2,00,000 लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता 


अयोध्येतील प्रभुराम मंदिराच्या उद्घाटनामुळं येत्या चार ते पाच वर्षांत 1,50,000 ते 2,00,000 लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अयोध्येत हॉटेल चेन, अपार्टमेंट युनिट्स, आरोग्य सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. ज्यामुळे अयोध्येत 50,000 ते 1 लाख तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. पुढील काही वर्षात मोठा विकास अयोध्या आणि आसपासच्या परिसरात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


हॉटेल्स, टुरिझम यांसारख्या ट्रॅव्हल क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होणार


पुढील काही वर्षांत दरवर्षी 5 कोटी लोक अयोध्येला भेट देतील. येत्या काही महिन्यांत 1 ते 2 लाख पर्यटक येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे 10,000 ते 30,000 नोकऱ्या त्वरित निर्माण होतील. हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, टुरिझम यांसारख्या ट्रॅव्हल आणि टुरिझमशी संबंधित क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होणार आहे. याशिवाय अन्न आणि पेये, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणि बँकिंग क्षेत्रांना याचा फायदा होईल. अयोध्येत मागणी वेगाने दिसत आहे.


 पर्यटनचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार 


मंदिराच्या उद्घाटनापूर्वी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने अंदाज व्यक्त केला होता की मंदिराच्या अर्थव्यवस्थेतून निर्माण होणारा व्यवसायाचा आकडा 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. दिल्लीसह देशभरातील लोकांमध्ये प्रभुराम मंदिराबद्दल असलेला प्रचंड उत्साह आणि देशातील 30 शहरांमधून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर कॅटने ही आकडेवारी जाहीर केली आहे. येथील पर्यटनचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ayodhya Development Plan : श्रीरामाची अयोध्यानगरी आधुनिक होणार, दीक्षु कुकरेजा यांच्यावर अयोध्येच्या विकासाची जबाबदारी