एक्स्प्लोर

Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 

Aviation Sector Subsidy : पश्चिम आशियातील वाढत्या युद्ध तणावामुळे विमानाचे इंधन (ATF) प्रचंड महागलं असून या संकटातून विमान कंपन्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल (Crude Oil) आणि विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफच्या (ATF Aviation Turbine Fuel) किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे सध्या देशातील हवाई वाहतूक क्षेत्र (Aviation Sector) मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. इराण आणि अमेरिका (Iran vs US War) यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलसह विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या 'एव्हिएशन टर्बाइन फ्यूल'वर झाला आहे. इंधन महागल्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला असून, त्याचा भार तिकीट दरवाढीच्या रूपाने प्रवाशांवर पडत आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

एबीपी नेटवर्कच्या इंडिया@ 2047  या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी याबाबत वक्तव्य केलं. केंद्र सरकार या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एव्हिएशन सेक्टरला तब्बल 10,000 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज (Fund) देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे एअरलाइन्स आणि सरकारी तेल कंपन्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक बोजा कमी करणे हा या फंडचा मुख्य उद्देश आहे.

Aviation Turbine Fuel Rate : मागच्याच महिन्यात किमतीत 8.56  टक्के वाढ

देशात मागच्याच महिन्यात विमानाचे इंधन असणाऱ्या ATF च्या किमतीत 8.56 टक्क्यांची प्रचंड वाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर एटीएफचा भाव प्रति किलोलीटर 96,638 रुपयांवरून थेट 1,04,927 रुपयांवर पोहोचला आहे.

भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा थेट फटका देशांतर्गत विमान कंपन्यांना आणि सरकारी तेल कंपन्यांना (OMCs) सहन करावा लागतो.

Domestic Flight Passenger Drop : देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत मोठी घसरण

या वाढत्या महागाईच्या काळात विमान कंपन्यांसमोर आणखी एक मोठं संकट उभं राहिले आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्यांत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मंदी आणि वाढलेल्या तिकिटांमुळे विमान कंपन्यांना अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. एका आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मार्च महिन्याच्या तुलनेत 4.2 टक्क्यांनी घसरून 1.38 कोटींवर आली आहे.

Oil Companies Appeal : किमती न वाढवण्याचं तेल कंपन्यांना साकडे

या वाढत्या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी इंडियन एअरलाइन्सने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांसारख्या प्रमुख सरकारी तेल कंपन्यांकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. जोपर्यंत पश्चिम आशियातील युद्ध आणि तणावाची परिस्थिती पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत देशांतर्गत विमानांसाठी (Domestic Flights) एटीएफच्या किमती वाढवू नयेत, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे. आता सरकारच्या 10 हजार कोटींच्या संभाव्य फंडमुळे विमान प्रवास स्वस्त होणार का आणि विमान कंपन्यांना कशा प्रकारे तातडीची मदत मिळणार, याकडे संपूर्ण उद्योग जगताचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
AI मुळं चिंता वाढली! 'या' लोकांसाठी धोक्याची घंटा, नोकरी जाण्याचा धोका, जाणून संपूर्ण माहिती 
AI मुळं चिंता वाढली! 'या' लोकांसाठी धोक्याची घंटा, नोकरी जाण्याचा धोका, जाणून संपूर्ण माहिती 
PM Kisan Yojana : 20 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा होणार, 'ही' गोष्ट पूर्ण करा अन्यथा...
PM Kisan Yojana : 20 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा होणार, 'ही' गोष्ट पूर्ण करा अन्यथा...
पंतप्रधानांच्या हस्ते २,४०० कोटींचे वाटप; 'पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना' काय आहे? जाणून घ्या सविस्तर
पंतप्रधानांच्या हस्ते २,४०० कोटींचे वाटप; 'पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना' काय आहे? जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Embed widget