भारतात ऑडीची गाडी सुस्साट; पहिल्या 3 महिन्यात विकल्या भरमसाठ कार; बिझनेस 23 टक्क्यांनी वाढला

कंपनीच्या ऑडी क्‍यू७ आणि ऑडी क्‍यू8  यांसारख्‍या मॉडेल्‍सच्या सातत्‍यपूर्ण लोकप्रियतेमुळे विक्रीच्या आकडेवारीला पाठबळ मिळाले आहे.

Continues below advertisement

Business: जर्मन लक्झरी 'ऑडी ' कार भारतात सुसाट धावतेय .नवीन वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत ऑडी इंडियाच्या विक्रीत भरमसाठकार विक्री झाली आहे .पहिल्या तिमाहीत ऑडीच्या विक्रीत भारतात तब्बल 23% वाढ झाली आहे . ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज 2025 च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी त्‍यांच्‍या विक्री आकडेवारीची घोषणा केली. कंपनीने या कालावधीत 1223 युनिट्स विक्रीसह सकारात्‍मक कामगिरी नोंदवली. या विक्रीमध्‍ये 2024 च्‍या पहिल्‍या तिमाहीच्‍या तुलनेत 17 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. यामधून लक्‍झरी कार बाजारपेठेतील ब्रँडची वाढती मागणी दिसून येते. 

Continues below advertisement

2025 च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील प्रभावी निकालांमधून आपला वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि नवीन पुरवठा साखळी स्थिरतेमधून फायदा घेण्‍याचे ऑडी इंडियाचे यशस्‍वी प्रयत्‍न निदर्शनास येतात. कंपनीच्या ऑडी क्‍यू७ आणि ऑडी क्‍यू8  यांसारख्‍या मॉडेल्‍सच्या सातत्‍यपूर्ण लोकप्रियतेमुळे विक्रीच्या आकडेवारीला पाठबळ मिळाले आहे. तर ऑडी इंडियाने भारतातील रस्‍त्‍यांवर 100000 कार्स धावण्‍याचा टप्‍पा साजरा केला. 

कंपनीच्या या यशाबद्दल बोलताना ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ''आम्‍हाला पहिल्‍या तिमाहीच्‍या उल्‍लेखनीय निकालांसह 2025ची सकारात्‍मकतेसह सुरूवात करण्‍याचा आनंद होत आहे. गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत या वाढीमधून ब्रँड ऑडीमध्‍ये असलेला ग्राहकांचा आत्‍मविश्‍वास आणि आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओची ताकद दिसून येते. 2024मध्‍ये पुरवठ्यासंदर्भातील आव्‍हानांची यशस्‍वीपणे पूर्तता केली असल्‍याने आम्‍ही भारतातील लक्‍झरी गतीशीलतेकरिता वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहोत. आम्‍ही अपवादात्‍मक उत्‍पादने व अनुभव वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, तसेच आम्‍ही आगामी वर्षामध्‍ये सकारात्‍मक कामगिरीसाठी उत्‍सुक आहोत.'' 

2025 मध्ये तुफान विक्री

ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस या ब्रँडच्‍या पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने आपली विकास गती कायम राखली, जेथे 2024मधील याच कालावधीच्‍या तुलनेत 2025च्‍या पहिल्‍या तिमाहीत 23टक्‍के वाढ केली. देशभरातील प्रमुख ठिकाणी 26 केंद्रांसह कार्यरत राहत हा विभाग प्रमाणित पूर्व-मालकीच्‍या लक्‍झरी वेईकल्‍ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याच्‍या ऑडी इंडियाच्‍या धोरणाचा आधारस्‍तंभ आहे. ऑडी इंडियाने नुकतेच 'ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स' लाँच केली. ही ऑडीच्‍या लाइनअपमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्‍ही आहे आणि या एसयूव्‍हीमध्‍ये लक्‍झरीच्‍या लॅपमधील दैनंदिन उपयुक्‍ततेसह अपवादात्‍मक कार्यक्षमता आहे. या एसयूव्‍हीला ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि 2025 च्‍या तिसऱ्या तिमाहीपर्यंत संपूर्ण विक्री करण्‍यात आली आहे.

हेही वाचा:

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola