Ashneer Grover : अश्नीर ग्रोव्हर, शार्क टँक या प्रसिद्ध शोमुळे घराघरांत पोहोचलेलं नाव. BharatPe कंपनीचे माजी (Bharatpe) सह-संस्थापक आणि एमडी असणारे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) कंपनीच्या अंतर्गत वादामुळे चर्चेत होते. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत पायउतार व्हावं लागलं होतं. हेच अश्नीर ग्रोव्हर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या ट्वीटमुळे अश्नीर ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 


अश्नीर ग्रोव्हर यांनी  डिजिटल लेंडिंग गाईडलाईन्स (Digital Lending Guidlines) बाबत भारतीय रिझर्व्ह बँकेवर (Reserve Bank Of India) जोरदार टीका केली आहे. आणि RBI च्या गाईडलाईन्सना जगातील सर्वात निरुपयोगी गाईडलाईन्स असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, या गाईडलाईन्समुळे फिनटेक फर्म (Fintech Firms)  डिजिटल लेंडिंग ( Digital Lending) देण्यापासून परावृत्त होतील.






भारतपेचे ( Bharatpay) माजी सह-संस्थापक  (Co-Founder) आणि शार्क टँक इंडियाचे ( Shark Tank India) जज अश्नीर ग्रोव्हर यांनी ट्वीट केलं आहे की, "जर यूपीआय (UPI) जगातील सर्वोत्तम टेक आणि रेग्युलेटरी इनोवेशनअसेल, तर RBI च्या डिजिटल लेंडिंग गाईडलाईन्स सर्वात वाईट आहेत. त्यांनी पुढे लिहिलं आहे की, "आरबीआय फिनटेकला सांगत आहे, 'प्लीज, डिजिटल लेंडिंग शेंडिंग करू नका! ते बँकेतून होत नाही, आम्हाला समजत नाही आणि पेन पेपरची विक्रीही कमी होईल."






दरम्यान, अश्नीर ग्रोव्हर यांनी ट्वीट करुन थेट रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सवरच निशाणा साधला आहे. पण सोशल मीडियावर अश्नीर ग्रोव्हर यांनी मांडलेल्या मताशी अनेकांनी असहमत दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी अश्नीर ग्रोव्हर यांना वेगवेगळ्या फिनटेक कंपन्यांकडून देण्यात आलेल्या  त्रासाची आठवण करुन दिली. एका यूजरनं बरोबर बॉस असं लिहिलं आहे. डिजिटल लेंडिंगच्या नावाखाली 52 टक्के व्याज आकारलं जात आहे आणि त्याला फिनटेक कंपन्यांच्या नाविन्यपूर्णतेचं नाव दिलं जात आहे? हे इनोवेशन नाही. ते थांबवले पाहिजे.


यापूर्वी जेव्हा आरबीआयनं क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करण्याची घोषणा केली होती, तेव्हा त्यांनी आरबीआयच्या निर्णयाला मोठं पाऊल म्हटलं होतं. मात्र व्यापारी सवलतीच्या दराबाबतही त्यांनी भीती व्यक्त केली होती.


...म्हणून अश्नीर ग्रोव्हर यांनी दिला BharatPe चा राजीनामा


19 जानेवारी रोजी, भारतपेचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी मार्चपर्यंत रजेवर जाण्याची घोषणा केली होती. खरं तर, जानेवारीच्या सुरुवातीला एका ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये अश्नीर कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याला फोनवर धमकावत होते. Nykaa च्या IPO दरम्यान शेअर्स वाटप करताना बँकेकडून अनियमितता झाल्याचा आरोप करत, ते संबंधिताला धमकावत होते.


मात्र, अश्नीर यांनी ही क्लिप बनावट असल्याचे म्हणत, हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, नंतर असे लक्षात आले की, अश्नीर आणि त्यांची पत्नी माधुरी यांनी ऑक्टोबर 2021मध्ये कोटक महिंद्रा बँकेला Nyka च्या IPO ला वित्तपुरवठा करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल नोटीस पाठवली होती.