Apple Layoffs News : अॅपलसारख्या (Apple)  मोठ्या कंपनीमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अशा मोठ्या कंपन्या सर्रास नोकरकपीतसारखं (Layoffs) कठोर पाऊल उचलत नाहीत. पण, अॅपल कंपनीने नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ॲपल बुक्स ॲप आणि ॲपल बुकस्टोअर टीममधून अनेक लोकांना काढून टाकले आहे. कंपनीने एकाच वेळी 100 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील दणका बसला आहे. 


जगातील सर्वात मोठी कंपनी ॲपलमध्येही टाळेबंदी करण्यात आली आहे. कंपनीने लोकांना ॲपल बुक्स ॲप आणि ॲपल बुकस्टोअरमधून काढून टाकले आहे. ॲपल बुक्स कंपनीला आता प्राधान्य नाही. कंपनी आता ती चालवण्याइतकी उत्साही राहिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 100 कर्मचारी या नोकरकपातीचे बळी ठरले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना सेवा विभागातून काढून टाकण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या छाटणीचा फटका अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बसला आहे.


ॲपल बुकस्टोअरकडून कंपनीला फार अपेक्षा नाहीत


वरिष्ठ उपाध्यक्ष एडी क्यू यांच्या सेवा समूहातूनही अनेकांना काढून टाकण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका ॲपल बुक्स आणि ॲपल बुकस्टोअरच्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. ॲपल बुक्स-ॲपल बुकस्टोअरकडून कंपनीला फारशा अपेक्षा नाहीत. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा हवाला देत या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीला आता ॲपल बुक्स आणि ॲपल बुकस्टोअरकडून फारशा अपेक्षा नाहीत. दरम्यान, सध्या या कंपनीत सुमारे 100 कर्मचारी या नोकरकपातीचे बळी ठरले आहेत.


ॲपल भारतात सुमारे 6 लाख नोकऱ्या देणार का?


दरम्यान, ॲपल भारतात सुमारे 6 लाख नोकऱ्या देणार असल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. यापैकी सुमारे 2 लाख थेट नोकऱ्या आयफोन निर्मिती विक्रेत्यांकडून निर्माण होणार आहेत. मात्र, अशातच कंपनीने नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं भारतात आता एवढी मोठी नोकऱ्यांची भरती अॅपल करणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, असे मानले जाते की प्रत्येक प्रत्यक्ष नोकरी 3 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करते. याशिवाय ॲपलने भारती एअरटेलसोबत संगीत पुरवठ्यासाठी करारही केला आहे. एअरटेल यूजर्स आता ॲपल टीव्ही आणि ॲपल म्युझिकचा आनंद घेऊ शकणार आहेत. एअरटेलने आपले विंक म्युझिक ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Kevan Parekh : Apple कंपनीच्या उच्च पदावर आणखी एक भारतीय, CFO पदी निवड झालेले केविन पारेख कोण?