मुंबई : दक्षिण मुंबई (SoBo) येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय अनहदची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये तिने तिच्या पगाराबद्दल आणि मासिक खर्चाबद्दल माहिती दिली आहे. अनहदने सांगितले की ती दरमहा 2.67 लाख रुपये कमवते.  कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच इतकी मोठी रक्कम कमवत असल्याची माहिती तिने दिली आहे.  

अमेरिकेतील 75 लाखांची नोकरी सोडून ती भारतात आली

अनहद ही मार्केटिंग व्यावसायिक आहे. तिला अमेरिकेत 75 लाखांची नोकरी होती, ही नोकरी सोडून ती मुंबईत वार्षिक 40 लाख रुपये कमवत आहे. 2024 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, अनहद न्यू यॉर्कला गेली होती. तिथे तिने कोणत्याही पगाराशिवाय एका भारतीय किराणा दुकानात इंटर्न म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तिने एका मार्केटिंग एजन्सीमध्ये नोकरी स्वीकारली, जिथे तिला फक्त 20 डॉलर प्रति तास मिळत होते, जे पुरेसे नव्हते. त्यानंतर अनहदला दरवर्षी 60,000 डॉलर (सुमारे 51 लाख रुपये) पूर्णवेळ नोकरीची ऑफर मिळाली आणि त्यानंतर एप्रिलमध्ये तिला 75,000 डॉलर (64 लाख रुपये) ची नोकरी मिळाली. पण व्हिसाच्या समस्या आणि तणावामुळे ती भारतात परतली. आता तिच्या कंपनीने तिला दूरस्थपणे काम करण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे ती घरी बसून महिन्याला 40 लाख रुपये कमवत आहे.

बचतीसोबतच स्वतःवरही खर्च 

अनहदने सांगितले की ती मुंबईत तिच्या पालकांसोबत राहते. त्यामुळं तिचे भाडे किंवा किराणा मालावरील खर्च वाचतो. मासिक 2.67 लाख पगारापैकी 1.80 लाख रुपये थेट तिच्या एसआयपीमध्ये जातात. त्यानंतर, ती बाहेर खाणे, पार्लरमध्ये जाणे, मित्रांसोबत बाहेर फिरणे इत्यादी खर्चांवर 87000 रुपये खर्च करते. जूनमध्ये तिने बाहेर खाण्यावर 16000 रुपये खर्च केले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

SBI Paid 19 Lakhs to Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा एक जुगाड अन् SBI कडून मिळतात दरमहा 19 लाख रुपये, कोणत्या स्किममध्ये गुंतवणूक केली?