Amol Kolhe on State Govt : माजी मंत्री राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे ( MLA Prajakt Tanpure) यांनी आयोजित केलेल्या आदिशक्तीचा जागर या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थिती लावली. राहुरी शहरात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी हजारो महीलांसमोर अमोल कोल्हे यांनी लाडकी बहिण योजनेवरून (ladki Bahin Yojana) महायुती सरकारचा चांगलाच समाचार घेतला. भाषणातून शेरोशायरी करत उपस्थित महिलांची मने देखील जिंकली. आपली बहीण आधीपासूनच लाडकी..लोकसभेला मतांची झाली कडकी.. म्हणून बहिण लाडकी...असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सरकारला टोला लगावला.


नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?


आपली बहीण आधीपासूनच लाडकी...
लोकसभेला मतांची झाली कडकी.. म्हणून बहिण लाडकी...
भाऊ कधी ओवाळणी टाकल्यावर बहिणींना विचारात नाही पैसे आले का? आले का?...
मुख्यमंत्री मात्र विचारत होते...
आले का? आले का?...
बहिणी म्हणतात खिशातून दिले का?...
बहिण लाडकी हे चांगलच...
मात्र दाजींच्या सोयाबीन, दुधाला भाव द्या...
तरच बहिण लाडकी म्हणता येईल...


लांडी, लबाडी, चोरी करून पक्ष फोडणाऱ्यांना घरी बसवा


अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन, दुधाला भाव द्या अशी मागणी देखील कोल्हे यांनी केली आहे. लांडी, लबाडी, चोरी करून पक्ष फोडणाऱ्यांना घरी बसवा असं आवाहन देखील अमोल कोल्हे यांनी उपस्थित महिलांना केलं. सरकार कोणते आणायचे हे माता भगिनी ठरवणार असल्याचे कोल्हे म्हणाले. 


चाय पे शुरु हुई सरकार... गाय पे आकर अटक गयी...
बात तो 15 लाख की हुईं थी...
पंधरासौ मे कैसे सिमट गयी?


अशी शेरो शायरी करत खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 


महाराष्ट्रातील जुलमी, अन्यायी, भ्रष्टाचारी सरकार घालवण्यासाठी कंबर कसा 


दादा, भाई, भाऊ.. ये गुलाबी धुल हमारी आंखो मे ना झोके...आपको गद्दारी के भी 50 खोके...
और लाडली बहना सिर्फ 1500 मे ओके? असे कोल्हे म्हणाले. कुणी आपला स्वाभिमान पंधराशे रुपयात विकत घेण्याचा प्रयत्न करत असेल तर माता भगीनींच्या स्वाभिमानाचे राज्य आणण्यासाठी आई जगदंबेला साकडं घाला. महाराष्ट्रातील जुलमी, अन्यायी, भ्रष्टाचारी सरकार घालवण्यासाठी कंबर कसा असं आवाहन खासदार कोल्हे यांनी केलं. 


महत्वाच्या बातम्या:


येऊ नको म्हटलं तरी कुठल्या गाडीत बसू अशी अजितदादांची अवस्था; अमोल कोल्हेंची टीका