तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं असं वक्तव्य इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी केलं होतं.  या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर आपली मतं व्यक्त केली आहे. पण तरुणांना, नव्या पिढीला नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यावर नेमकं वाटतं आहे, त्या संदर्बातील माहिती आपण पाहणार आहोत. तरुणांना ऑफिसमध्ये 9 तासांपेक्षा जास्त वेळ घालवायला आवडत नसल्याचे समोर आले आहे. 


भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी : नारायण मूर्ती 


माझी शिफ्ट संपली आहे, आता मी निघतोय… तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये हे अनेकदा ऐकलं असेल. खरं तर, अलीकडेच इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करायला हवं असं सुचवलं होतं. एका दिवसाच्या दृष्टीने पाहिले तर लोकांनी हे काम दिवसातून 10 तास करावे. कामाची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी हे सांगितले होते. नारायण मूर्ती यांच्या मते, भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे, ती वाढवण्याची गरज आहे. त्यांनी भारतातील तरुणांना जपान आणि जर्मनीच्या धर्तीवर असे करण्याचा सल्ला दिला होता. आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर मत व्यक्त केले. नारायण मूर्ती यांनी यांच्या या वक्तव्यानंतर तरुणांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. 


कार्यालयात काम करण्याबद्दल तरुणांना काय वाटतं?


नवीन पिढीतील लोकांना ऑफिसमध्ये 9 तासांपेक्षा जास्त वेळ घालवणे आवडत नाही. त्यामुळे 9 तास संपताच ते घराकडे निघतात. अनेकवेळा मुलाखतींमध्ये ऐकले की लोकांना कंपनी किंवा नोकरीबद्दल तपशील वाचण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. ऑफिसमध्ये 9 तास काम केल्यानंतर ते इतके थकतात की त्यांना इतर कामांसाठी वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत नारायण मूर्ती यांच्या 70 तासांच्या कामाचा विचारही कोणी करु शकत नाही. फक्त 9 तास संपले की लोक म्हणतात की माझी शिफ्ट संपली आणि आता मी निघतोय.


सोशल मीडियावर तरुण काय म्हणाले 


सोशल मीडियावर नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर एका युजरने लिहिले आहे की, मी याच्याशी सहमत आहे. तुमच्या मालकासाठी 40 तास आणि स्वत:साठी 30 तास काम करा. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की तो आठवड्यातून 70 तास काम करण्यास पूर्णपणे असहमत आहे. 70 तासांच्या कामकाजाच्या आठवड्यानुसार, आपण सर्वोत्तम देश होऊ, परंतु कोणत्या किंमतीवर? आठवड्यातून 70 तास काम केल्यानंतर ती व्यक्ती काय साध्य करेल? चांगले आरोग्य? छान कुटुंब? चांगला साथीदार? आनंद? व्यक्ती काय साध्य करेल असे सवाल तरुणांनी केले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ashneer Grover :'आजही भारतात कामाच्या तासांना जास्त महत्त्व दिलं जातं', नारायण मूर्तींच्या सल्ल्यावर अश्नीर ग्रोवर म्हणाले...