न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये मेक अमेरिका ग्रेट अगेन धोरण राबवलं आहे. त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवन बी व्हिसाचं शुल्क 88 हजार रुपयांवरुन 88 लाख रुपये केलं. त्यानंतर आता अमेरिकेनं व्हिसासाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार ज्यांना अमेरिकेचा एच वन बी व्हिसा आणि एच फोर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मिडिया खात्यांची तपासणी केली जाणार आहे.  हे नियम 15 डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. 

Continues below advertisement

US Visa New Rule : अमेरिकेला जायचंय सोशल मीडिया जपून वापरा

अमेरिकेत जायचं असेल तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणं गरजेचं आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल मीडिया तपासला जाणार आहे. यासंदर्भातील नियमावली 15 डिसेंबर पासून लागू केली जाणार आहे.एचवन बी व्हिसा आणि एच फोर व्हिसा देण्यासाठी अर्जदारांची सोशल मीडिया खाती तपासली जाणार आहेत. यामुळं ज्या अर्जदारांची खाती प्रायव्हेट असतील ती पब्लिक करावी लागणार आहेत. ज्यामुळं अमेरिकन यंत्रणा सोशल मीडिया खाती तपासू शकतात.  अमेरिकेविरोधात , अमेरिकेतील राजकीय चळवळीवर अथवा अतिरेकी विचारांचे समर्थन केले असल्यास व्हिसा मिळणार नाही. 

अमेरिकेच्या डिजिटल फुटप्रिंट पॉलिसीच्या विस्ताराचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं इमिग्रेशन तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मिच वेक्सलर यांनी म्हटलं की अमेरिकेनं यापूर्वी F,M आणि J व्हिसा अर्जांसाठी सोशल मीडिया पॉलिसी लागू केली होती. आता त्याचा विस्तार करुन ते H-1B आणि H-4 साठी देखील लागू करण्यात आला आहे. तज्त्रांच्या मते अर्जदारांचे व्हिसाचे अर्ज मंजूर करताना सूक्ष्मपणे पडताळणी केली जाणार आहे. 

Continues below advertisement

अमेरिकेच्या व्हिसा मंजूर करणाऱ्या विभागाकडून अर्जदारांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील प्रोफाईल, पब्लिक पोस्टची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक व्हिसा अर्ज मंजूर करताना राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं. अमेरिकेचा व्हिसा हा बहुमान आहे मात्र अधिकार नाही, असंही सांगण्यात आलं आहे. 

अमेरिकेनं जून महिन्यात विद्यार्थी व्हिसा मंजूर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार अर्जदारानं त्याच्या प्रोफाईलचा काही भाग प्रायव्हेट केलेला असल्यास किंवा त्याचा ऑनलाईन  प्रेझेन्स नसल्यास निगेटिव्ह मार्किंग करण्यात येणार आहे.  अमेरिकन नागरिक, संस्था, संस्कृती यांच्या विरोधात पोस्ट असल्यास, दहशतवादी गटांना पाठिंबा दिला असल्यास किंवा अमेरिकेच्या संवेदनशील तंत्रज्ञानाचा गैरवापर केला असल्यास व्हिसा नाकारला जाईल.